टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतामध्ये ट्रॅक्टर पाठीमागे घेत असताना निष्काळजीपणा करुन ऋतीक संजय वाकडे (वय २६) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी राहुल रामचंद्र वाकडे याच्या विरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.८ रोजी १०.१५ वाजता यातील फिर्यादी राजेंद्र वाकडे यांचा मुलगा मयत ऋतीक वाकडे हा राहुल वाकडे याने आणलेला

न्यू हॉलंड ३६३० या कंपनीचा ट्रॅक्टर नंबर एम.एच.१३ डी.टी.८८३७ यास पाठीमागे रोटर जोडून शेतजमीन रोटरत असताना आरोपी राहुल वाकडे याने सदर ट्रॅक्टर पाठीमागे घेत असताना

रोटर असलेल्या शेतातील परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन जोरात पाठीमागे घेवून अविचाराने ट्रॅक्टर चालवून तो ट्रॅक्टर व्यवस्थित चालतो अगर कसे ? हे पाहण्यासाठी उभे असलेल्या ऋतीक वाकडे याचे अंगावर ट्रॅक्टर घालून

रोटरच्या मशिनमध्ये अडकून त्यास डोकीस, हातास, पायास, खांदयास गंभीर जखमा करुन अति रक्तस्त्राव होवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













