मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात रांगडी अन् मनमौजी लोकं. आपल्या दिलखुलास वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आता कोल्हापुरातील एका उमेदवाराच्या शपथपत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

निवडून आल्यानंतर ‘हे आम्ही करणार नाही’ याची यादी देत आपच्या उमेदवारांचे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर अनोखे शपथपत्र जाहीर केले आहे. शपथपत्र सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत टक्केवारीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार असं सगळेच पक्ष आपल्या जाहीरनाम्यात सांगत असताना

राजर्षी शाहू आघाडी प्रणित आम आदमी पार्टीच्या वतीने थेट हे आम्ही करणार नाही असं पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र जाहीर करण्यात आले.
एक दोन नव्हे तर आम आदमीच्या 14 अधिकृत उमेदवारांनी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प वरती शपथपत्र जाहीर करत शपथ घेतली आहे.

उमेदवारांनी स्टॅम्पवर दिलेल्या शपथपत्रात काय नमूद केले?
मी निवडून आलो तर कोणत्याही कामात टक्केवारी खाणार नाही
माझा कोणताही अवैध व्यवसाय नाही

मी नगरसेवक झाल्यावर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही
जनसंपर्कासाठी माझा फोन 24 तास सुरु असेल
मी निवडून आल्यानंतर मी ज्या पक्षातून निवडून आलो आहे तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही..

मी निवडून आलो तर कोणत्याही कामात टक्केवारी खाणार नाही, माझा कोणताही अवैध व्यवसाय नाही, मी नगरसेवक झाल्यावर कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही अशा पद्धतीने हमी देणारे अनेक विषय असणारे शपथपत्र उमेदवारांनी जाहीर केले.
ही निवडणूक फक्त विकास कामांसाठी नाही तर महापालिका राजकारणात वावरत असलेल्या चुकीच्या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी असल्याचं आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी सांगितला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















