मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता ३००० रुपयांचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना डबल खुशखबर मिळणार आहे. ३००० रुपये एकत्र येणार असल्याने महिलांना खूप आनंद झाला आहे. याचसोबत आता लाखो महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे. यामागचे कारण काय ते जाणून घ्या.

३० लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते.

यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातील काही महिलांनी केवायसी केली आहे.

राज्यातील जवळपास ३० लाख महिलांनी केवायसी न केल्याची माहिती आता समोर आली आहे. यामुळे या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अनेक निकष ठरवून देण्यात आले आहेत. यामध्ये महिलांच्या पतीची आणि वडिलांची केवायसी करणे अनिवार्य आहे.

या केवायसीमध्ये जर महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्याचे आढळले तर त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. याचसोबत ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.

केवायसी न केल्यास लाभ बंद
राज्यातील जवळपास ३० लाख लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण केली नाहीये. यातील सव्वा लाख महिला या सोलापूर जिल्ह्यातील आहेत. केवायसीसाठीची मुदतवाझ संपली आहे.

ही मुदत वाढवून मिळेल, अशी आशा महिलांनी होती. मात्र, सध्या तरी मुदत वाढवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे ३० लाख लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता न मिळण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












