मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुलीच्या लग्नासाठी मुलाचा फोटो दाखवला असता मुलीने त्यावर काहीही न बोलता मौन पाळले, यामुळे रागाच्या भरात पित्याने मुलीला मारहाण केली.

मुलीला सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नीला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार शेळगाव (ता. बार्शी) येथे ६ जानेवारी रोजी रात्री १० च्या सुमारास घडला.

या प्रकरणी शमा फिरोज शेख यांच्या फिर्यादीनुसार पती फिरोज खाजा शेख, सासू लैला खाजा शेख आणि सासरे खाजा वजीर शेख (सर्व रा.शेलगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी (दि. ६ जानेवारी २०२६) रात्री १० च्या सुमारास फिरोज शेख यांनी त्यांची मोठी मुलगी सानिया हिचे लग्न जमवण्यासाठी मोबाइलमध्ये एका मुलाचा फोटो दाखवला.

मात्र, मुलीने फोटो पाहून हो किंवा नाही असे काहीच उत्तर दिले नाही. मुलीच्या या मौनाचा राग आल्याने फिरोज यांनी मुलीला हाताने मारहाण केली.

आपल्या मुलीला पती मारत असल्याचे पाहून शमा या सोडवण्यासाठी मध्ये पडल्या. यावेळी सासू लैला आणि सासरे खाजा यांनी, “तू मुलीच्या लग्नाला नकार का देतेस?” असे म्हणत शमा यांना पकडले.

पती फिरोज यांनी कुन्हाडीच्या लाकडी दांड्याने शमा यांना बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोहेकों सोमनाथ खांडेकर हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











