मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा नगरपरिषदेसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या मतदानामध्ये 69.74 टक्के इतके मतदान झाले असून सर्वाधिक मतदान महिलांचे 10 हजार 6 म्हणजेच पुरुष 9 हजार 964 मतदारांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान कुठेही अनुचीत प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मंगळवेढा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज शनिवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अत्यंत चुरशीने मतदान झाले.

सकाळी थंडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे यावेळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. सूर्याचा पारा जसजसा वाढत गेला त्या प्रमाणे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्यामुळे मतदाना करण्यामध्ये अधिक चुरस दिसून येत होती.

शहरामध्ये 28 हजार 638 एकूण मतदार असून निवडणूकीसाठी 19 हजार 971 इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे.
मतदारांनी लावली हजेरी
मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी अपंग, वृद्ध आदी मतदारांनीही हजेरी लावली होती. दरम्यान एका मतदान केंद्रावर अपंगांना बसून जाण्यासाठीची व्हीलचेअर तुटल्यामुळे अपंग मतदारांना त्याचा त्रास सहन करावा लागला.

मतदान शांततेत होणेकामी डी.वाय.एस.पी. डॉ.बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार दिगंबर गेजगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग, नागेश बनकर, विजय पिसे आदी सर्वजण मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवून होते.

मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन निवडणूकीत दिल्याचा थेट आरोप-प्रत्यारोप प्रसार माध्यमाजवळ केल्याने मंगळवेढा तालुकयात चर्चेला उधाण आले आहे. इंग्लिश स्कूल प्रशालेत आदर्श मतदान केंद्र उभे करण्यात आले होते. ते फुग्याने सुशोभित केल्याने सर्व मतदारांचे लक्ष खेचून घेत असल्याचे चित्र होते.

आज अनेक ठिकाणी नगरपरिषदेसाठी मतदान करण्यात आले आणि ठिकठिकाणी शांततेत मतदान पार पडले. गेल्या कित्येक वर्षापासून निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते आणि अखेर जनतेच्या वाट बघण्याला न्याय मिळाला आहे.
यावेळी अनेक ठिकाणी जास्त प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून आले. गेल्या मतदानाच्या तुलनेत बऱ्याच ठिकाणी टक्केवारी वाढली असल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान आता उद्या २१ डिसेंबर रोजी या मतदानाचा निकाल काय लागणार आहे याकडे जनता डोळे लाऊन बसली आहे.
दरम्यान, भाजप व तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून विजयाचे दावे केले जात आहेत. उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









