मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी निवडणूक दिनांक 20 डिसेंबर रोजी होत असून या निवडणुकीसाठीची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 21 रोजी पार पडणार आहे.
मतमोजणी पंढरपूर रस्त्यावरील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. यासाठी एकूण 10 टेबल लावण्यात येणार असून प्रत्येक टेबलवर एक प्रभाग याप्रमाणे मतमोजणी होणार आहे. दिनांक 21 रोजी सकाळी बरोबर 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

एकाच वेळी 1 ते 10 प्रभागातील पहिल्या मतदान केंद्राची मतमोजणी सुरू होणार आहे.
मतमोजणीचे एकूण 4 फेऱ्या होणार असून चौथ्या फेरीत प्रभाग क्रमांक 10 मधील फक्त एका मतदान केंद्राचा समावेश आहे.

प्रत्यक्ष मतमोजणी करणाऱ्या पथकामध्ये 10 टेबलवर एकूण 44 कर्मचारी नियुक्त केलेले असून इतर विविध पथकामध्ये एकूण 46 कर्मचारी असे तब्बल 90 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

मतमोजणीचे फेरीनिहाय आकडे त्या त्या त्या वेळी घोषित केले जाणार असून नगराध्यक्ष पदाचा निकाल सर्वात शेवटी घोषित केला जाणार आहे.
जर दोन उमेदवार यांना समसमान मते मिळाली तर अशा वेळी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार घोषित केला जाणार आहे.

मतमोजणी कक्ष व परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वगळता इतर सर्व कर्मचारी तसेच उमेदवार व त्यांचे सर्व प्रतिनिधी यांना मोबाईल घेऊन येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मतमोजणी कक्ष परिसरात मीडिया सेंटर ची स्थापना करण्यात आली असून माध्यम प्रतिनिधी यांच्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. फेरीनिहाय मतमोजणीचे आकडे मीडिया सेंटरला देण्यासाठी एक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मतमोजणी साठी शासकीय धान्य गोदाम परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












