टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुमच्या विचारांचा भाजप उमेदवारनगराध्यक्ष सुजाता जगताप व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना निवडून द्या महिलांच्या विकासाचे प्रश्न शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही आमदार चित्रा वाघ यांनी दिली आहे.
जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे आज मंगळवेढा नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार प्रा.सौ.सुजाता उर्फ सुप्रियाताई अजित जगताप यांच्यासह सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी त्या बोलत होत्या.

पुढे म्हणाले की, मंगळवेढा शहरातील नागरिकांचे प्रमुख प्रश्न सोडविण्यासाठी भाजप सरकारच्या माध्यमातून मंगळवेढा शहराला मोठ्या प्रमाणावर निधी सरकारने दिला आहे.

नगरपालिका शाळा इमारत बांधकाम, किल्ला सुशोभीकरण, कृष्ण तलाव सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरण आदी सर्व विकास कामासाठी निधी दिलेला आहे.

आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष उमेदवार सुजाता जगताप व सर्व नगरपालिका यांना भरघोस मतांनी निवडून द्या येणाऱ्या काळात मागेल तेवढा निधी भाजप सरकार मंगळवेढा शहराला देईल असा विश्वास आमदार चित्रा वाघ यांनी दिला.

लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येक महिन्याला पैसे जमा होत आहेत ही योजना भाजप सरकार सत्तेत आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहणार आहेत. शहराच्या विकासासाठी सर्व लाडक्या बहिणींना भाजप सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले.

यावेळी महिलांशी थेट संवाद साधत शहराच्या विकासात महिलांची भूमिका, सक्षम नेतृत्व, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य आणि स्वयंरोजगार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मेळाव्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यांचा आत्मविश्वास आणि परिवर्तनासाठीची सकारात्मक भूमिका पाहता महायुतीच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास या मेळाव्यातून व्यक्त झाला. महिलांच्या सहभागातून मंगळवेढ्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

या मेळाव्यासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळ महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्रीमती पार्वतीताई आवताडे, माजी सभापती विष्णुपंत आवताडे, महिला नेत्या सौ.अंजलीताई आवताडे, ज्येष्ठ नेते रामचंद्र जगताप,

माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, भाजप महिला आघाडीच्या आशा पाटील आदी मान्यवर तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










