टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला शहरातील कॅफेमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवत तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने लंपास केले.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवम विलास चव्हाण (रा. सुस्ते, ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीशी आधी ओळख वाढवली. त्यानंतर दि.८ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास मंगळवेढा शहरातील एका कॅफेत नेले.

लग्नाचे आमिष दाखवून तेथे नमूद तरुणाने स्वतः समवेत मोबाईलमध्ये तिच्यासोबत सेल्फी काढला. यानंतर ‘तुझ्याजवळील सोन्याचे सर्व दागिने मला दिले नाहीस,

तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन,’ अशी धमकी देत पीडितेकडील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास सपोनि गिरीष जोग हे करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











