मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सांगोला तालुक्यातील सोनंद मंडलचे वादग्रस्त मंडल अधिकारी उल्हास पोलके यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लल्लन पवार (रा.गळवेवाडी, ता. सांगोला) यांना एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून पैसे न दिल्यास खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी मंडल अधिकारी पोलके यांनी दिली होती. हे प्रकरण आता मंडलअधिकारी पोलके यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

तक्रारदार लल्लन पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंडलाधिकारी उल्हास पोलके यांनी तक्रारदार यांचे जेसीबी मशिन बेकायदेशीररित्या आपल्या ताब्यात घेऊन लल्लन पवार यांच्याकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

शिवाय घटनास्थळी केवळ २ ब्रास इतका वाळूसाठा आढळून आला असतानाही मंडल अधिकारी उल्हास पोलके यांनी तब्बल ५ ब्रास वाळू दाखविण्याचा प्रयत्न करून खोटा पंचनामा करण्याचा प्रयत्न केला होता.
तक्रारदार लल्लन पवार यांनी मंडलाधिकारी उल्हास पोलके यांना एक लाख रुपये देण्यास नकार दिल्याने तक्रारदार पवार यांची जेसीबी मशीन ताब्यात घेऊन उलट पवार यांना पैसे न दिल्यास शासकीय कामात अडथळा आणला म्हणून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती.

त्याबाबत तक्रारदार लल्लन पवार यांनी सदर प्रकरणी तहसीलदार सांगोला यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज दाखल केला होता. तत्कालीन तहसीलदार संतोष कणसे यांनी सदर अर्जाची चौकशी करून जिल्हाधिकारी सोलापुर यांच्याकडे अहवाल पाठवला होता.

या अहवालानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांनी कर्तव्यात कसूर करून अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या वादग्रस्त मंडल अधिकारी उल्हास पोलके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











