मंगळवेढा टाईम्स न्युज।
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ सार्वत्रिक नगरपंचायतींमधील निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२५ दि. ०४ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे.

निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचेकडील प्राप्त निर्देशानुसार मतदानादिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन मतदान प्रक्रिया निर्भय व निःपक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले आहे.

सार्वत्रिक नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या जाहीर कार्यक्रमानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मतदान २० डिसेंबर व मतमोजणी २१ डिसेंबर रोजी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यास अनुसरून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मतदानादिवशी शनिवार २० डिसेंबर व मतमोजणी रविवार २१ डिसेंबर रोजी नमुद नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीतील आठवडा बाजार भरवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

बार्शी येथील आठवडा बाजार शनिवारी तसेच सांगोला व मोहोळ येथील आठवडा बाजार रविवारी भरवण्यात येतो. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी आदेश दिले आहेत की,

मतदान केंद्राच्या परिसरात सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खालील नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील आठवडा बाजार २० डिसेंबर २०२५ व मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी असल्याने सदर आठवडा बाजार भरवण्यास मनाई करण्यात आली.

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात प्रवेश करण्यास निर्बंध
सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुक २०२५ ची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात २० डिसेंबर २०२५ रोजी होणा-या मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदारांव्यतिरिक्त मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघामध्ये प्रवेश करण्यास निबंध घालणे आवश्यक आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















