टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूकीसाठी उद्या मतदान होणार असून प्रभाग क्रमांक 5 मधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवक पदासाठीच्या अधिकृत उमेदवार सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी व अनिल बोदाडे यांच्याकडून प्रभागामध्ये जोरदार प्रचार करण्यात आला आहे.
दरम्यान, सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांच्या प्रचारास मतदारांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनंदा (आबी) बबनराव आवताडे उपस्थित होत्या. दोन्ही उमेदवार एकाच वेळी प्रभागामध्ये आल्यामुळे नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जात त्यांच्या भेटीगाठी घेत उमेदवारांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच प्रभागाबद्दलचे असलेले विकासाचे स्वप्न त्यांच्यापुढे मांडण्यात आले. त्यामुळे एक विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला.

मंगळवेढा नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 5 हा मोठा भाग असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. त्यामुळे प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी करीत आहेत.

यावेळी प्रत्येक घरामध्ये नागरिकांकडून उमेदवारांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महिला भगिनींकडून त्यांचे औक्षण करण्यात आले.

यावेळी प्रर्भागात असणाऱ्या लहान मोठ्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठीचे व्हिजन सौ.प्रीती सूर्यवंशी यांनी नागरिकांसमोर मांडले. त्यासोबत अनिल बोदाडे यांनी देखील प्रभागाचा विकास नियोजनबद्धरित्या करण्यासाठीचा विश्वास व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक 5 मध्ये असणारी कचऱ्याची समस्या, सार्वजनिक शौचालयाची समस्या, रस्ते समस्या सोडविण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार असल्याचे, सौ.प्रीती सूर्यवंशी यांच्याकडून सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित महिला भगिनींनी प्रभाग क्रमांक 5 मधून सौ.प्रीती सूर्यवंशी, अनिल बोदाडे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनंदा आवताडे विक्रमी मतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













