टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा नगरपालिकेसाठी रणधुमाळी सुरू असून प्रभाग 2 मधून भाजपकडून उभे राहिलेले समाधान हेंबाडे यांनी आधी जनतेची कामे केली आहेत आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार असून हेंबाडे यांना प्रभागातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

समाधान हेंबाडे यांनी आतापर्यंत नागणे गल्ली, खंडोबा गल्ली, दत्तू गल्लीतील बंद असलेले रेशन प्रत्येक घरात सुरू केले असून त्याचबरोबर प्रत्येक जेष्ठ नागरिकांना श्रावणबाळ योजना, विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुरू केला आहे.

तसेच नगरपालिका शाळेतील स्वच्छतेसाठी आवाज उठवला असून नागरिकांचे नगरपालिकेत स्वच्छालयाचे अनुदान रखडले होते ते मिळवून देण्यासाठी जन आंदोलन उभे करून प्रत्येकाला अनुदान प्राप्त करून दिले आहे.

लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना या योजनेसाठी अनेक लाभार्थी वंचित होते त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लाभ मिळवून दिला आहे.

सोलापूर-कोल्हापूर हायवेसाठी शेतकरी बांधवांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांचा मोठ्या प्रमाणात मोबदला रखडला होता, शासन स्तरावर पाठपुरावा करून मोबदला मिळवून दिला आहे.
मंगळवेढा शहरामध्ये प्रमुख रस्त्याच्या ठिकाणी अपघात होत होते अपघात टाळण्यासाठी गतिरोधक होण्यासाठी आंदोलन उभे केले.

प्रभाग 2 मधील गल्लीबोळातील पेव्हिंग ब्लॉक बदलून रस्त्याचे काँक्रीट करण आमदार समाधान आवताडे यांच्या विकास निधीतून करून घेण्यात मोलाचा सहभाग आहे.

महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग भवन मंगळवेढ्यात सुरू झाले आहे, दिव्यांग भवन सुरू करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान हेंबाडे यांचा मोठा वाटा आहे.
मंगळवेढा नगरपालिकेचा असणारा दिव्यांग निधी गरजूंना वाटप करून कायमस्वरूपी लाभ घेण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
व्हिजन
प्रभागातील प्रत्येक रस्ता धूळ मुक्त करून नवीन दर्जेदार रस्ते करण्यासाठी प्रयत्न असणार आहे, 24 तास पाणी उपलब्ध होण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगरपालिकेतील शाळेसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखली आहे.

मंगळवेढा नगरपालिकेला पार्किंग उपलब्ध नसल्यामुळे रोडवरती वाहने असतात त्यामुळे पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा शहराच्या विकासात भर घालण्यासाठी विकासात्मक कामे करण्यात मोलाचा वाटा राहणार असल्याचे समाधान हेंबाडे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










