मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तिहेरी अपील प्रकरणामुळे राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. रागिनी कांबळे, सुनंदा आवताडे आणि सुप्रिया जगताप या तिन्ही उमेदवारांमधील कायदेशीर संघर्षाने निवडणूक प्रक्रियेलाच वेगळे वळण दिले आहे.

काल बुधवारचा दिवस या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा ठरला. सर्व अपिलांची संपूर्ण सुनावणी बुधवारी पंढरपूर न्यायालयात पूर्ण झाली असून, अंतिम निर्णय आज गुरुवारी जाहीर होणार आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणुकसंदर्भात पंढरपूर जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या तीन अपीलामध्ये सुनावणी पूर्ण झाली असून त्यानुसार या अपिलात निर्णयाकरिता न्यायालयाने आज गुरूवार दि.२७ ही तारीख ठेवली आहे.

मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपद व नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरल्यानंतर काही अर्जना संबंधित उमेदवारांनी हरकती घेतल्या होत्या. त्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये सुनंदा अवताडे यांनी सुजाता जगताप यांच्या अर्जाला हरकत घेऊन त्यांना तीन अपत्य आहेत तसेच त्या शिक्षक म्हणून नोकरीस आहेत याबाबत त्यांनी लपवले आहेत म्हणून हरकत घेतली.

परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुजाता जगताप यांनी त्यांच्या शिक्षक पदाचा राजीनामा निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी दिलेला आहे व त्यांना तीन अपत्य असल्याबाबतचा कोणताही कागदपत्रे पुरावा दाखल नसल्याबाबत सुनावणी दरम्यान निष्कर्ष काढून सदरचा अर्ज मंजूर केला होता.
तसेच रागिनी कांबळे यांनी सुनंदा अवताडे यांचा मुलगा नगरपरिषदेचा ठेकेदार असून त्याची कामे चालू असल्यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर करण्याची मागणी केली होती.

परंतु त्या स्वतः ठेकेदार आहेत असा कुठेही पुरावा आलेला नाही तसेच त्यांचा मुलगा व त्यांचे पती यांच्या दरम्यान सन २०१५ मध्ये न्यायालयामार्फत वाटप झालेले आहे त्यामुळे त्यांचे एकत्र हिंदू कुटुंब राहिलेले नाही असा निष्कर्ष काढून हरकत फेटाळली होती.
रागिनी कांबळे यांचा अर्ज पाच सूचक यांच्यासह नसल्याने नामंजूर केलेला होता याकरता त्यांचे वकील संताजी माने यांनी नगरसेवकांचा कायदा व नगराध्यक्ष पदाचा कायदा वेगवेगळ्या असल्याचे सांगितले त्याबद्दल सरकारी वकील सारंग वांगीकर यांनी दोन्ही कायद्यातील तरतुदी न्यायालयासमोर वाचून दाखवल्या जरी वेगवेगळे कायदे असले तरी अपक्ष पदाकरता पाच सूचक आवश्यक आहेत.

व कांबळे यांच्या अर्जावर पाच सूचक आहेत तेच पाच सूचक प्रवीण खवतोडे यांच्या अर्जावर आहेत नियमानुसार एका व्यक्तीला दोन अर्जाला सूचक म्हणून सही करता येत नाही व प्रवीण खवतोडे यांचा अर्ज प्रथम असल्याने तो निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रथम मंजूर केला त्यामुळे कांबळे यांच्या अर्जाला चार सूचक राहिल्याने व त्या अपक्ष असल्याने त्यांना पाच सूचक आवश्यक असल्याने नामंजूर केलेला होता व दोन्ही कायद्यात ही तरतूद नमूद असल्याने हे अपील चालत नाही असा युक्तिवाद करण्यात आला.
यात अपीलदार सुनंदा अवताडे यांच्यातर्फे निलेश ठोकडे व रागिनी कांबळे यांच्यातर्फे अॅडव्होकेट एस.एल. माने व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यातर्फे सरकारी वकील सारंग वांगीकर यांनी बाजू मांडली. त्यानुसार या अपिलात निर्णयाकरिता न्यायालयाने आज गुरूवारी तारीख नेमली असून याकडे संपूर्ण मंगळवेढा शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











