
मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनंदा बबनराव आवताडे व भाजपच्या उमेदवार सुजाता अजित जगताप यांच्या अपिलावर आज सुनावणी होणार असून याकडे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक ६ मधील उमेदवार मनीषा मेटकरी यांच्याविरोधात कमल मुदगुल यांनी पंढरपूर येथील न्यायालयात दाखल केलेल्या अपिलावर निर्णय होऊन उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या विवरणपत्रात मालमत्तेचे विवरण दिले नाही

म्हणून त्याचा अर्ज बाद करता येणार नाही, लोकशाहीत उमेदवाराची निवड करण्याचे मूलभूत अधिकार हे मतदारांना असल्याने

उमेदवार मनीषा मेटकरी यांच्या विरोधात केलेले अपील पंढरपूर न्यायालयाने फेटाळले आहे.

प्रभाग सहामधील भाजप उमेदवार मनीषा मेटकरी यांच्या विरोधात तीर्थक्षेत्र आघाडीच्या उमेदवार कमल मुदगूल यांनी छाननी प्रक्रिया सुरू असताना मालमत्तेचे विवरण पत्र दिले नाही म्हणून हरकत घेतली होती, उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती,

तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्यांचा अर्ज वैध ठरवला होता. त्या विरोधात कमल मुदगूल यांनी पंढरपूर येथील न्यायालयात अपील केले होते.

कमल मुदगुल यांच्याकडून पंढरपूर येथील अॅड. किरण घाडगे यांनी युक्तिवाद केला तर मनीषा मेटकरी यांच्याकडून अॅड. संतोष माने यांनी युक्तिवाद केला.

अर्जासोबत सर्व मालमत्तेची विवरण दिले असून उमेदवाराने अर्जासोबत सहकारी संस्थेच्या मालमत्तेचे विवरणपत्र दिले नसले तरी ती मालमत्ता चेअरमन या नात्याने त्यांची होऊ शकत नाही.
केवळ एक ते दोन गुंठे जमिनीचे विवरणपत्र दिले नाही, म्हणजे निवडणुकीवर परिणाम होऊ शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२५ मध्ये दिलेल्या निकालाचा आधार घेत सदरचे अपील फेटाळण्यात यावे, असा युक्तिवाद केला. अॅड संताजी माने यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने अपील फेटाळून अॅड. मनीषा मेटकरी यांचा अर्ज मंजूर केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










