मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सध्या कमी खर्चात जास्त नफा देणाऱ्या पिकांची मागणी वाढत आहे. अशा पिकांपैकी एक म्हणजे सिंदूर हे महत्त्वाचे मसाला व नैसर्गिक रंगद्रव्य देणारे झाड. औषधी गुणधर्म, नैसर्गिक रंगनिर्मिती आणि निर्यातक्षमतेमुळे सिंदूरची शेती आज शेतकऱ्यांसाठी लाखोंचे उत्पन्न देणारा लाभदायक व्यवसाय ठरत आहे.

सिंदूर म्हणजे काय?
सिंदूर (बिक्सा ओरेलाना) हे उष्ण कटिबंधीय झाड आहे. त्याच्या बोंडात लालसर दाणे असतात, ज्यापासून नैसर्गिक रंग ‘अनॅट्टो’ तयार होतो. हा रंग पूजापाठ, अन्नपदार्थ, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, साबण, तसेच औषध उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. रासायनिक रंगांना पर्याय म्हणून सिंदूरची मागणी जगभर वेगाने वाढत आहे.

कमी खर्च, जास्त नफा
एकदा लागवड केली की 20 ते 25 वर्षे उत्पादन या पिकातून उत्पादन मिळते. तसेच रोग कीड कमी येते. कोरडवाहू परिस्थितीतही त्याची उगवण क्षमता चांगली आहे.

एका झाडापासून वर्षाला 2 ते 5 किलोपर्यंत बियां मिळतात. बाजारात 1 किलो सिंदूर बियांचा दर 250–400 रुपये इतका मिळू शकतो. त्यामुळे 200 ते 300 झाडांमधून वर्षाला लाखोंचे उत्पन्न शक्य आहे.

शेती कशी करावी? हवामान आणि जमीन
सिंदूर वनस्पतीला उष्ण व दमट हवामान अनुकूल आहे. हलकी ते मध्यम काळी जमीन, वालुकामय जमीन उत्तम. पाण्याचा निचरा योग्य असावा.
लागवड कधी करावी?
जून–जुलै महिन्यात रोपांची लागवड सर्वोत्तम. रोपे नर्सरीत तयार करून ३ ते ४ फूट उंच झाल्यावर लावली जातात.

लागवड अंतर
प्रति झाड 3×3 किंवा 4×4 मीटर अंतर ठेवल्यास उत्पादन चांगले मिळते. एका एकरात 250 ते 300 झाडे सहज बसतात.

पाणी व्यवस्थापन
पहिल्या वर्षी 8–10 दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर झाडे स्थिर झाली की कमी पाण्यातही वाढ चांगली होते.
खत व्यवस्थापन
कमी खतांमध्येही उत्पादन चांगले मिळते. गोमूत्र, शेणखत आणि कंपोस्टचा वापर अधिक फायदेशीर.

सिंदूरपासून किती कमाई होते?
एक झाड सरासरी 3 किलो बिया देते असे गृहित धरल्यास 1 किलो दरचा 300 रुपये
एका झाडाचे उत्पन्न 900 रुपये तर 250 झाडांचे वार्षिक उत्पन्न 2,25,000 रुपये
300 झाडांचे उत्पन्न 2,70,000 ते 3,00,000 रुपये उत्पन्न मिळते.
याशिवाय सिंदूर बियापासून नैसर्गिक रंग, पेस्ट, तेल तयार करून विकल्यास नफा दुप्पट ते तिप्पट वाढतो. निर्यातक्षम असल्याने एकदा मार्केट मिळाले की वर्षाला 5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे.

एकूणच काय तर कमी मेहनत,कमी गुंतवणूक आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारे पीक म्हणून सिंदूरची शेती शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. योग्य नियोजन, रोप व्यवस्थापन व बाजारपेठेशी संपर्क ठेवल्यास ग्रामीण भागातील शेतकरीही सिंदूरच्या माध्यमातून दरवर्षी लाखोंची कमाई करू शकतात.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












