मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
लेकीला भेटून येतो, असं सांगून घरातून निघाले ते कधीही न परतण्यासाठीच. घरातून निघाले पण लेकीच्या घरी पोहोचण्यापूर्वीच बापाचा मृत्यू झाला. तिकडे लेक बाबा येतील म्हणून दाराकडे डोळे लावून बसली होती.
पण, आली ते वडिलांच्या मृत्यूची बातमी. वाटेत एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

तर, बाबांची अखेरची भेटही होऊ न शकल्याने लेकीने सुन्न करणारा आक्रोश केला. तर या घटनेने कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. तर, ज्या वाहन चालकाने या व्यक्तीच्या दुचाकीला धडक दिली, तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

मंगळवेढा ब्रह्मपुरी या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी एक भीषण अपघात घडला. या घडलेल्या भीषण अपघातात 60 वर्षीय बब्रुवहान यशवंत सोनवणे (राहणार ब्रह्मपुरी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

लेकीला भेटण्यासाठी घरातून निघालेल्या बब्रुवहान सोनवणे यांचा लेकीच्या घरी जाण्याचा हा प्रवास अखेरचा ठरला आहे. पाठीमागून आलेल्या कारणे दिलेल्या भरधाव धडकेत त्यांच्या मोटरसायकलचा चेंदामेंदा झाला आणि त्यातच त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

याबाबतची फिर्याद किशोर सोनवणे यांनी दिली असून दिवंगत बब्रुवहान सोनवणे हे एम एच 13 डी के 3211 या दुचाकीवरून मंगळवेढ्याकडे जात होते.
यावेळी इंडियन पेट्रोल पंपाजवळील पाटील वस्ती परिसरात ते पोहोचताच के ए 48 एम 4205 या कारच्या चालकाने भरधाव वेगात येत मागून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर तो कारचालक थांबून मदत करणे तर दूरच तो घटनास्थळावरून थेट पसार झाला.
ही धडक इतकी जबरदस्त होती की सोनवणे यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. अपघातानंतर गाडीचा चेंदामेंदा झाला, तर सोनवणे यांना रस्त्यावर पडलेलं पाहून आसपासचे लोक धावत आले.
त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे ब्रह्मपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










