मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस असून भाजपकडून इच्छूक असलेल्या प्रा.तेजस्विनी सुजित कदम आज आपला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

भाजप त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करेल अशी अपेक्षा असून तशी नेत्यांकडून प्रयत्न सुरू असून, भाजपने उमेदवारी दिली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी केले असल्याचे बोलले जात आहे.

तेजस्विनी कदम या गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गल्लोगल्ली फिरत आहेत, त्यांनी आपले व्हिजन सर्वसामान्य जनतेला पटवून दिले असून जनतेमधून त्यांना पाठिंबा वाढला असल्याचे चित्र आहे.

मंगळवेढा नगरपालिकेचा कारभार पुन्हा सर्वसाधारण महिलेच्या हाती जाणार असल्यामुळे अनेक महिला मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत.

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कडून पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी झेंडा फडवण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली आहे.

अशा परिस्थितीत त्यामधील काहींनी आघाडी करून निवडणूक लढवण्याबद्दलचा सुर व्यक्त केला. मात्र भाजप पक्षाने लोकसभेला व विधानसभेला कमळ चालते मग नगरपालिकेला का नको ही भूमिका ठेवून नगरपालिका कमळ चिन्हावर लढवण्याबद्दल पुढाकार घेतला.
भाजपकडून प्रा.तेजस्विनी कदम, प्रा.सुप्रिया जगताप, राधा सुरवसे या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या.
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता जोरदार रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पार्टी कडून नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम या आज सोमवारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील असा सुज्ञ मतदारांकडून विश्वास व्यक्त केला जात आहे.

यामध्ये मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांची संख्या वाढली आहे. भाजपकडून साहजिकच प्रा.तेजस्विनी कदम यांची उमेदवारी निश्चित होऊन त्या आज उमेदवारी अर्ज दाखल करतील असे बोलले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज








