टीम मंगळवेढा टाईम्स।
माणगंगा परिवार अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. शाखा मंगळवेढा यांचा यशस्वी तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्त, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) इंगोले व संस्थेच्या चेअरमन सौ. अर्चनाताई इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली बालदिन 14 नोव्हेंबर रोजी ‘माणगंगा परिवार मॅरेथॉन 2025’ ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

मंगळवेढा तालुका व पंचक्रोशीतील चिमुकल्या स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. जवळपास २५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आरोग्य, व्यायाम व तंदुरुस्तीचा महत्वाचा संदेश समाजापर्यंत पोचवला.

आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना, या मॅरेथॉनच्या माध्यमातून मुलांनी “व्यायामाचे आणि आरोग्याचे महत्त्व” अधोरेखित केले.

विजेते विद्यार्थ्यांची यादी
स्पर्धेचे दोन गट करण्यात आले होते.
(1) मुलांचा गट व (2) मुलींचा गट
मुलांमध्ये विजेते :
🥇 प्रथम – विराज शंकर धुमाळ
🥈 द्वितीय – बिलाल होजा शेख
🥉 तृतीय – दीपक राजाराम दुधाळ

उत्तेजनार्थ :
संस्कार अनिल केदार, जीन कुमार विश्वजीत लवटे, अर्णव विलास माने, आदेश राहुल देशमुख
मुलींमध्ये विजेते :
🥇 प्रथम – रंजना सत्यप्पा कोळेकर
🥈 द्वितीय – भाग्यश्री विश्वजीत लवटे
🥉 तृतीय – काजल धनाजी भोसले

उत्तेजनार्थ :
रूपाली मसु इंगळे, अल्फी अब्बास मकानदार, अनुजा धोंडीराम हजारे, असलीमा अमिन मुलानी, अवनी नितीन टाकणे, अर्पिता संतोष माळी, पंकजा समाधान बुरांजे, पूर्वी आकाश बिनवड

सन्मान व समारोप
स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचा प्रशस्तीपत्र व गुलाबफुल देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप शिवतीर्थ, छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास वंदन करून करण्यात आला.

विशेष आभार
या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या
वारी परिवार, शिव प्रतिष्ठान,MH 13 GROUP, संस्थेचे सर्व सभासद, अधिकारी व कर्मचारीवृंद यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











