मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
बिहारमध्ये नीतीश-मोदी-चिरागच्या एनडीएची त्सुनामी आली. 243 पैकी 203 जागा एनडीएनं जिंकल्या आहेत. राजद आणि काँग्रेसचं गठबंधन अक्षरश: वाहून गेलं. बिहारच्या जनतेनं, विशेषत: बिहारमधील महिला मतदारांनी एनडीएच्या पारड्यात मतांचं भरभरुन दान टाकलं.
एनडीएच्या विजयाची आणि महागठबंधनच्या पराभवाची महत्त्वाची कारण काय आहेत ते या स्पेशल रिपोर्टमधून पाहुयात,

टायगर अभी जिंदा हे… बिहार मतलब, नितीश कुमार.. बिहारच्या विधानसभा निवडणुकाचा निकाल सांगण्यासाठी पाटण्यात लावण्यात आलेले हे बॅनर्स पुरेसे आहेत. तेजस्वी यादवांनी मोठी हवा तयार केली असताना, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या जोडीनं अशी काही कमाल केली की एनडीएचा आकाडा तब्बल 200 पार गेला.

एनडीएच्या विजयाची प्रमुख कारणं
मोदी-नितीश जोडीचा आश्वासक चेहरा
‘डबल इंजिन सरकार’चा मुद्दा प्रभावी
भाजप-जदयूचं काटेकोर नियोजन
महिलांच्या खात्यांत 10 हजार रुपये
1.5 कोटी महिला रोजगार योजनेच्या लाभार्थी
‘लाडकी बहीण’ योजनेची हॅटट्रिक
महिला मतदारांच्या संख्येत वाढ
पेन्शन,

रोजगार कार्डधारकांना ‘डीबीटी’
125 युनिट मोफत वीज
‘जंगलराज’ची भीती घालण्यात यश
मित्रपक्षांना सोबत ठेवण्यात यश
चिराग, मांझी यांचं ‘सोशल इंजिनिअरिंग’
मोदी, शहांसह केंद्रीय मंत्री प्रचारात
भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या अनेक सभा

दिल्ली स्फोटाचा दुसऱ्या टप्प्यात परिणाम?
बिहारमधील एनडीएच्या विजयात मोलाचा वाटा असलेले महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गेल्या अडीच वर्षांपासून बिहारमधील प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला आणि महायुतीचा विजय निश्चित केला.

पण, दुसरीकडे तेजस्वी यादवांनीही जवळपास 200 सभा, रॅली काढत, चांगलाच माहोल तयार केला होता. मग, असं काय घडलं की महागठबंधनला विरोधी पक्षनेतेपदही मिळणं कठीण झालंय?
महागठबंधनच्या पराभवाची प्रमुख कारणं
शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटपात घोळ
काँग्रेस-राजदमध्येच जागावाटपावरुन तणाव
काँग्रेसकडून ‘पार्टटाईम’ प्रचार
राहुल गांधींचा तुलनेनं कमी प्रचार
काँग्रेसच्या अन्य मुख्यमंत्र्यांची प्रचारात गैरहजेरी
तेजस्वी यादवांचा एकाकी प्रचार
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात विलंब
लालू यादवांच्या घरातच संघर्ष
तेजप्रताप यादव यांची वेगळी चूल
तेजप्रतापांचे तेजस्वींवर भ्रष्टाचाराचे आरोप

एनडीएविरोधात निगेटिव्ह कॅम्पेन
नितीश कुमारांच्या आजारपणावरुन प्रचार
मोदींच्या मातोश्रींचा एआय व्हिडीओ
स्थानिक मुद्द्याऐवजी मतचोरीसारख्या मुद्द्यांना महत्व
आश्वासनपूर्तीचा रोड मॅप देण्यात अपयश
खरं तर पराभवानंतर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. मात्र काँग्रेस-आरजेडीच्या नेत्यांनी आजही मतचोरीवर भर दिला. निवडणूक आयोगावर आरोप, मतचोरीचे दावे… आजही काँग्रेस याच मुद्द्यांवरून पलटवार करतंय.
पण, बिहारसारखं राज्य जिथं 20 वर्षांपासून नितीश कुमारांचं सरकार होतं, जिथं म्हणायला अँटीइन्कम्बन्सी होती, जिथं रोजगार, स्थलांतरासारखे मुद्दे होते… तिथंल्या मतदारांनी मात्र मतचोरीसारख्या मुद्द्यांना साफ नाकारलं. हेच निकाल सांगून जातो.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














