मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरात सध्या नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक घोषित होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाकडून सर्वच बाबतीत दूरदृष्टीचे राजकारण केले जात आहे.

मंगळवेढा तालुक्यात होत असलेल्या निवडणुकांच्या निमित्ताने अजित पवार राष्ट्रवादी, शिंदे सेना, काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, ठाकरे सेनेच्या अस्तित्वाची तर भारतीय जनता पक्षाच्या प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत.

तालुक्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे हे केंद्रस्थानी आहेत. इतर पक्षातील नेत्या कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षात झालेले व संभाव्य प्रवेश ही भारतीय जनता पक्षाची जमेची बाजू करत आ.आवताडे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी पहिल्या टप्यात पक्षाने दिलेला टास्क पूर्ण केला आहे.

दुसरीकडे भाजप कडून तेजस्विनी कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित जगताप यांनी आता घड्याळ चिन्हावर उमेदवार उभे करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली असल्याचे बोलले जात आहे. ते स्वतः वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.

तर भाजप विरोधात समविचारी आघाडी आता अस्थितवात आली असून भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेते आता एकाच छताखाली आले आहेत. यांच्या आघाडीत बिघाडी न होण्यासाठी जागा वाटत कसे होईल याकडे इच्छूकांचे लक्ष लागले आहेत.

नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या इच्छुक निवडणुकातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आमदार समाधान आवताडे, शशिकांत चव्हाण यांच्यासह स्थानिक निरीक्षकांनी घेतल्या. तो अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. उमेदवारीची घोषणा आता येत्या एक दोन दिवसात करण्यात येणार आहे.
मित्र पक्षाला विश्वासात न घेता भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीची प्रक्रिया अलगदपणे पार पाडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मित्र पक्षातील घटक पक्षांनीही इतर पर्याय निवडत स्थानिक आघाड्यात समावेश होण्याचा यशस्वी घाट घातला आहे.

एकंदर होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीसह आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची, तर मित्रपक्ष असणाऱ्या अजित राष्ट्रवादीसह एकनाथ सेना, काँग्रेस, शरद राष्ट्रवादी, ठाकरे सेनेच्या अस्तित्वाच्या ठरणार आहेत.
दरम्यान, पक्षीय राजकारणाला छेद देत निर्माण झालेल्या सर्वपक्षीय आघाड्यांना आता मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून येणाऱ्या काही दिवसात उमेदवारा बाबत निर्णय घेतला जाणार आहे. विरोधकांना भाजप आमदार समाधान आवताडे यांना रोखण्यात कित पत यश मिळते हे पाहावे लागणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












