मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. तरीही यामागे काही घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्याचा रोख पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडे आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामागे फरिदाबाद कनेक्शन असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.

सोमवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद येथे कारवाई करत सात दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर संध्याकाळी दिल्लीमध्ये स्फोट झाला.

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवावे
दिल्ली स्फोटानंतर आता सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई करत ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवावे आणि पाकिस्तानवर पुन्हा एकदा हल्ला करावा अशी मागणी केली जात आहे.

सोशल मिडियावर अनेक यूझर्सनी या घटनेचा निषेध करत ‘Operation Sindoor 2.0’ असा टॅग वापरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका यूजर्सने लिहिले आहे की, ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवत, देशांतर्गत कारवाई करत दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना संपवलं पाहिजे. आतून मदत मिळाल्याशिवाय कोणताही दहशतवादी हल्ला शक्य नाही.

एका यूजर्सने लिहिलं आहे की, जर दिल्ली स्फोटामागे पाकिस्तानचा हात असेल तर हे आता सहन करण्यापलिकडचे आहे. त्यांच्या रक्तातच दहशतवाद असले तर पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून संपवावं लागेल. त्यासाठी ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवावं.
एक यूजरने लिहिलं आहे की, देशातील 140 कोटी जनता तुमच्या पाठीशी आहे, ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवण्याची हीच योग्य वेळ आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














