मंगळवेढा टाईम्स न्युज : संपादक : समाधान फुगारे
राज्यात सत्तेत असलेले तीन पक्ष आता एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे चित्र दिसत आहे मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आमने सामने भिडणार असून त्यादृष्टीने स्वतंत्र यंत्रणा उभी राहिली आहे.

मंगळवेढा भारतीय जनता पार्टीने नगरपालिका निवडणूक कमळ या चिन्हावर लढवणार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित जगताप यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे दर्शविले आहे.

दरम्यान, आमदार समाधान आवताडे व अजित जगताप यांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर आपले उमेदवार उभे करणार आहे.

एकीकडे भाजपमधून तेजस्विनी सुजित कदम हे नाव जवळपास फिक्स झाले असले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या पत्नी सौ.स्नेहा सोमनाथ आवताडे यांच्यासाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न देखील सुरू असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे दादासाहेब व नानासाहेब यांच्या रणनीतीमुळे आप्पासाहेबांची कोंडी केल्याचे बोलले जात असून आता येणाऱ्या काही दिवसांत चित्र वेगळे असणार आहे. आप्पासाहेब कोंडी फोडून कसे बाहेर निघणार? का दादा व नाना यांचीच कोंडी करणार हे लवकरच समजणार असले

तरी भाजप विरोधात काँग्रेस, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी, अजित पवार यांची राष्ट्रवादी व समविचारी आघाडी असे चार पॅनल होणार का तीन? याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










