मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
जो लोकांच्या भल्याची चिंता करतो, जो राज्याच्या विकासासाठी हातभार लावणारा प्रकल्प हिंमतीने यशस्वी करत असेल तर त्याला ताकद देणे, त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. आमदार अभिजीत पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशीर्वाद दिला आहे.

ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यापेक्षा शेतकऱ्याला ताकद देत आहेत. असा होतकरू तरुण ताकदीने मैदानात उभा आहे, तर त्याला ताकद दिली पाहिजे या भावनेतून आम्ही सर्वजण श्री विठ्ठल कारखान्याच्या सभासद आणि संचालक मंडळासोबत आहोत, असे प्रतिपादन भाजपचे गटनेते तथा मुंबई जिल्हा बँकेचे चेअरमन आ.प्रविण दरेकर यांनी केले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील पहिल्या ५ साखर पोत्यांचे पूजन आ. प्रविण दरेकर, त्यांच्या पत्नी सायली दरेकर व मुलगा डॉ. यश दरेकर या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन आ.अभिजीत पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. आ.दरेकर म्हणाले, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे वैभव आहे. मध्यंतरीच्या काळात कारखान्याला घरघर लागली होती.

आ.अभिजीत पाटील यांनी कारखान्याच्या व सभासदांच्या रक्षणासाठी उडी घेतली. त्यांच्या नेतृत्वावर तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला व कारखान्याचे नेतृत्व त्यांच्याकडे दिले. आज हा कारखाना पुन्हा पूर्ववत स्थितीत आणला याचा मनापासून आनंद झाला आहे.
याप्रसंगी संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे,
सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, महेश खटके, अंगद चिखलकर, तानाजी बागल आदींसह सर्व संचालक, सभासद उपस्थित होते. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी आभार मानले.

.. म्हणून मुंबई बँकेने ताकद दिली
मुंबई जिल्हा बँकेचे मुंबई हे कार्यक्षेत्र आहे. परंतु ग्रामीण भागातील कारखाने अडचणीत आले तर त्यांना ताकद देऊन उर्जितावस्थेत आणण्यासाठी आम्ही मदत करतो. आ.अभिजीत पाटील यांनी धाडसाने हा कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याचे काम केले, म्हणून मुंबई बँक त्यांच्यामागे ताकदीने उभी आहे.
आ.पाटील यांना ‘विठ्ठल’ एवढा पावला कि विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष होत असताना विधीमंडळाच्या सभागृहात येण्याची संधी तुम्ही त्यांना दिली, असेही आ.दरेकर म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










