मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या विचारांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, मंगळवेढा यांच्या बैठकीत ऐतिहासिक आणि हृदयाला भिडणारा निर्णय घेण्यात आला.

सर्वानुमते ठरविण्यात आलेल्या या निर्णयानुसार, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराचे ‘शिवतीर्थ’ असे नामकरण करण्यात आले आहे.

शिवप्रेमी चौकातील हा परिसर पुढील काळात मंगळवेढ्याचा अभिमान ठरणार आहे.

दररोज सकाळी ८ ते ९ या वेळेत शिवतीर्थावर शिवगीते गुंजणार, तर सकाळी ९ वाजता शिवमूर्तीचे पूजन आणि सामुदायिक ध्येयमंत्राचे पठण होणार आहे.

या उपक्रमामुळे प्रत्येक दिवसाची सुरुवात शौर्य, स्वाभिमान आणि प्रेरणेच्या स्वरांनी होईल. मंगळवेढ्यातील हा उपक्रम राज्यभरातील शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

मंडळाच्या सदस्यांनी सांगितले की, ‘शिवतीर्थ हा केवळ परिसर नाही, तर छत्रपतींच्या विचारांचा दरबार आहे. येथून उठणारा प्रत्येक जयजयकार समाजात एकतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश देईल.’

या निर्णयाचे स्वागत संपूर्ण मंगळवेढ्यात होत असून, स्थानिक नागरिक आणि तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवतीर्थ परिसर आता नव्या ऊर्जेने उजळला आहे. दररोजच्या शिवगर्जनेने वातावरण भारून जाईल, मनात प्रेरणेचा दीप उजळेल आणि प्रत्येक हृदयात ‘जय जिजाऊ.. जय शिवराय!’ अशी आरोळी घुमेल.

छत्रपतींच्या स्मृतींना जिवंत ठेवणे, हा आमचा धर्म. या उपक्रमामुळे नव्या पिढीत छत्रपतींच्या विचारांचे संस्कार रुजतील तसेच एकतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश समाजातपोहोचेल, शिवतीर्थाच्या माध्यमातून समाजात शिवसंस्कार रुजवणे, हेच आमचे ध्येय आहे,-सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, मंगळवेढा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










