मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
राज्यातील निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक प्रक्रियांची घोषणा केली.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये येत्या 2 डिसेंबरला मतदान होईल. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीत ८६,८५९ सदस्यांची निवड होणार आहे. तसेच २८८ अध्यक्षांचीदेखील निवड होणार आहे. निवडणूक प्रक्रिया जाहीर करताना निवडणूक आयोगाने उमेदवारांना काही नियम घालून दिले आहेत.

उमेदवारांना अर्ज ऑनलाइन करावा लागेल, तर अर्ज करताना जात प्रमाणपत्र द्यावे लागेल.

निवडून आल्यानंतर उमेदवाराला ६ महिन्यात ते प्रमाणपत्र द्यावं लागले. यासह निवडणूक आयोगानं उमेदवारांना खर्चाची अट घालून दिली आहे.

यासह निवडणुकीत उमेदवारांसाठी खर्चाबाबत मर्यादा ठरवून देण्यात आलीय. निवडणूक आयुक्तांनी प्रत्येक वर्गाच्या सदस्यांसाठी किती खर्च मर्यादा असेल याबाबत सविस्तर माहिती दिलीय.

नगर परिषद निवडणूक-
अ वर्गातील निवडणुकीत किती खर्च करता येणार?
अ वर्गातील नगर परिषदांच्या निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे. सदस्यपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी ५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असेन. तर अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्यांना १५ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल.

ब वर्गासाठी उमेदवारांना किती खर्च करता येईल
अ वर्गापेक्षा कमी खर्चाची मर्यादा देण्यात आलीय. ब वर्गाच्या नगर परिषदांसाठी सदस्य पदासाठी निवडणूक लढवणाऱ्यांना ३ लाख ५० हजार रुपये खर्च करता येईल. तर अध्यक्षपदाच्या उमेदवारांना ११ लाख २५ हजार रुपयांची मर्यादा आखून देण्यात आलीय.

क वर्ग
क वर्गाच्या नगर परिषदांमध्ये अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना ७ लाख ५० हजार रुपये खर्च करता येतील. तसेच सदस्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदारांना २ लाख ५० हजार रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलीय.
नगरपंचायतींच्या अध्यक्ष पदासाठी ६ लाखांची खर्च मर्यादा असेन. तर सदस्य पदासाठी २ लाख २५ हजार इतकी खर्च मर्यादा आखण्यात आलीय.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














