टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा ते मरवडे रोडने जाणाऱ्या अज्ञात टिप्परने पाठीमागून धडक दिल्याने कर्नाटकातून पंढरपूरकडे कार्तिकी एकादशीला निघालेले भाविक प्रकाश शेखरप्पा शिरससथळ्ळी, ४५, रा. चिक्का मजिगेरी, जि. दावनगिरी) यांच्या डाव्या पायाला जखम झाली.

तर त्यांच्यासोबतचे ईश्वर शिवप्पा पानीगट्टी (५६, रा. तेजस्वी नगर, धारवाड) यांचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला.

हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. प्रकाश शिरसथळ्ळी यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार कर्नाटकातील दिंडी गुरुवारी (दि.३०) सायंकाळी पाचच्या सुमारास मरवडे (ता. मंगळवेढा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील शाळेत मुक्कामाला होती.

भाविक ईश्वर शिवप्पा पान्नीगट्टी, नागराज मल्लीगोड, मंजुनाथ मन्नुर हे मरवडे गावापासुन पुढे सुभाष गोपाळ पवार यांच्या वस्तीवर नाश्त्यासाठी गेले होते.
सायंकाळी सहाच्या सुमारास प्रकाश शेखरप्पा शिरसथ्थळ्ळी व ईश्वर शिवप्पा पानीगट्टी पायी मरवडे गावाकडे जात होते.

यावेळी टिपरने पाठीमागून धडक दिली. त्यात ईश्वर शिवप्पा पानीगट्टी गंभीर जखमी झाले. त्यांना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ईश्वर शिवप्पा पानीगट्टी यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.(स्रोत:दिव्य मराठी)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











