टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या घामावर पुन्हा एकदा रातोरात डल्ला मारला आहे. भोसे गावातील नामदेव महादेव हासबे यांच्या वस्तीशेजारी ठेवलेला तब्बल २७ क्विंटल मका मध्यरात्री चारचाकी वाहनात भरून चोरट्यांनी पळवला.

शुक्रवारी रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत झालेल्या या धाडसी चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये परिसरात भीती निर्माण झाली आहे.
याहून संतापजनक म्हणजे गत आठवड्यातच पाठखळ हद्दीतील शिवाजी जाधव (रा. डोंगरगाव) या शेतकऱ्याच्या वस्तीवरून तब्बल ९६ हजार रुपये किमतीचा ४८ क्विंटल मका चोरट्यांनी लंपास केली होती.

त्या घटनेला आठवडा उलटूनही पोलिसांचा तपास ठप्पच आहे. मागचा तपास लागायचा बाकी असतानाच भोसे येथे पुन्हा तशीच चोरी घडल्याने ‘पोलिस झोपलेत का चोरटे?’ असा सवाल शेतकरीवर्गातून जोरात उमटू लागला आहे.

शेतकरी नामदेव हसबे यांनी पावसात राबून ८० पोती मका (प्रत्येकी ९० किलो) भरून पालाखाली झाकून ठेवला होता.

मात्र, पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री दबा धरत ३० पोती मका वाहनात भरून नेला. सकाळी उठल्यावर पाल फाटलेले आणि मका गायब झाल्याचे दृश्य पाहून हसबे हादरून गेले.

मंगळवेढा तालुक्यात आता चोरट्यांची रेकी-दिवसा, चोरी-रात्री अशी साखळी पद्धत सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पोलिस केवळ पंचनामा आणि चौकशीपुरते मर्यादित असल्याची नाराजी शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












