टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात लोकवर्गणीतुन उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण संदर्भात आज सायंकाळी 6 वाजता शिवप्रेमी चौकात तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती अश्वारूढ पुतळा समितीचे कार्याध्यक्ष यांनी दिली आहे.

मंगळावेढा शहरातील लोकवर्गणीतुन साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा लोकार्पणासाठी ज्या देणगीदारांनी देणगी दिलेली असून त्या सर्व देणगीदारांना

तसेच मंगळवेढा शहरातील शिवभक्तांना व तालुक्यातील शिवभक्तांना आज दि.25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता आनावरण विषयी विचार विनिमय करण्याकरीता अश्वरुढ पुतळ्याजवळ उपस्थित राहावे असे आवाहन पुतळासमीती कार्यअध्यक्ष यांनी केले आहे.

मंगळवेढा शहरात लोकसहभागातून उभा करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोहळा दि.26 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार होता.

मात्र अचानकपणे हा नियोजित दौरा रद्द झाला असून याबाबत आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

शहरांमध्ये अनेक संतांचे वास्तव लाभल्याने संताची भूमी म्हणून मंगळवेढा शहराची ओळख राज्यभर निर्माण झाली. अशा परिस्थितीत शहरात 360 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज विजापूर स्वारीवर जात असताना शहरातील भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांनी मुक्काम केला.

अशा पदस्पर्श झालेल्या झालेल्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा व्हावा ही येथील शिवभक्ताची मागणी होती त्यासाठी अनेक वेळा बैठका झाल्या परंतु त्याची अद्याप यश आले नाही.

मात्र येथील मराठा बांधवांनी पुतळा उभारणीमध्ये सर्व समाज बांधवांचा सहभाग असावा या भावनेतून लोकसहभागातून उभा करण्याचा शेवटी निर्णय घेतला त्यानुसार तब्बल 31 लाख रुपये लोकसभागातून जमा करण्यात आले.
त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 फुट उंचीची 4.5 टन वजनाची अश्वारूढ पुतळ्याची उभारणी मूर्तीकार महेंद्र धोपटे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली गतवर्षी हा पुतळा पुण्यावरून आणून मंगळवेढा शहरात ठेवण्यात आला.
शेवटी सुशोभीकरणासाठी शासनाने 75 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर याचे काम सुरू झाले.
आज होणाऱ्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जातोय याकडे संपूर्ण शिवभक्तांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजे अजून किती वाट पहावी लागणार
मंगळवेढा मध्ये स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा राहतोय त्याचा आम्हा सगळ्या मंगळवेढेकरांना अभिमान होता आनंद होता आणि या आनंदावर पुन्हा पुन्हा विरजण घातलं जातय.
कोणाच्या स्वार्थासाठी, कुणाच्या मानपणासाठी, कोणाच्या राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी तिसऱ्यांदा कार्यक्रम पुढे ढकलला जातोय की लाजिरवाणीच गोष्ट आहे- इंद्रजीत घुले, सुप्रसिद्ध कवी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














