मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथील पिण्यासाठी फिल्टरचे पाणी आणण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या संगणक अभियंता विघ्नेश संतोष पाटील (२२) व मजूर इक्बाल मुलाणी (५२) या दोघांना आंधळगाव येथील

आठवडा बाजारासाठी जाणाऱ्या पिकअप वाहनाने जोराची धडक दिल्याने जखमी झालेल्या उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आंधळगाव – गुंजेगाव मार्गावर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, गुंजेगाव येथील माजी सरपंच संतोष ऊर्फ विकास पाटील यांची आंधळगाव रस्त्याला शेती असून ते शेतात कुटुंबासह राहत असतात. त्यांचा मुलगा विघ्नेश हा पुणे येथे संगणक अभियंत्याचे शिक्षण घेत आहे.

तो नुकताच दिवाळीसाठी गावाकडे आला होता. शेतात मजूर असल्याने घरी पिण्यासाठी पाणी आणायला म्हणून तो स्वतः आणि त्याच्याकडे कामाला असणारे इक्बाल मुलाणी हे दोघे दुचाकीवरून गुंजेगावकडे पावणेचारच्या सुमारास निघाले होते.

दरम्यान, शेतातील कच्च्या रस्त्यावरून आंधळगाव गुंजेगाव या डांबरी रस्त्याला लागणार तोच गुंजेगावकडून आंधळगाव येथे आठवडी बाजारासाठी एक पिकअप भरधाव वेगाने जात होता.

त्या ठिकाणी झाडी असल्याने दोघांना हे वाहन आल्याचे समजले नसल्याने समोरासमोर जोराची धडक होऊन विघ्नेश व इक्बाल ह्यांच्या डोक्याला जोराचा मार लागून ते जखमी झाले.
यावेळी पिकअप येथील विजेच्या खांबाला धडकून पलटी झाले. तसेच येथील जोराच्या धडकेने लोखंडी खांब देखील वाकला आहे. जखमी दोघांना सांगोला येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

विघ्नेश हा एकुलता एक मुलगा असून तो शिक्षणासाठी पुणे येथे संगणक अभियंत्याचे शिक्षण घेत होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













