टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत दामाजीनगर गटातून दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे त्यातच आता ओबीसी उमेदवाराचा चेहरा समोर आहे. धर्मगावचे माजी सरपंच रामचंद्र सलगर शेठ हे नाव ओबीसी गटामधून पुढे येऊ लागले आहे.
दामाजीनगर गटातून एकमेव ओबीसी चेहरा समोर आल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
रामचंद्र सलगर शेठ यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून निवडून आल्यानंतर विकास काय असतो तो गटातील प्रत्येक गावाला समजेल असा विश्वास उद्योजक रमेश भुसे यांनी व्यक्त केला आहे.
रामचंद्र सलगर शेठ यांनी आत्तापर्यंत गावाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. गोरगरीब जनतेसाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट कुटुंबांना मिळवून देण्याचे काम त्यांनी पार पाडले आहे.
रामचंद्र सलगर शेठ यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयांची बँकेत ठेव ठेवली आहे.
आतापर्यंत त्यानी असंख्य कामी आपल्या जिल्हा परिषद गटातून मार्गी लावली आहेत त्या जोरावर निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
ओबीसी गटातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांना विविध संघटनेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. येत्या काही दिवसात आपला उमेदवारी अर्ज ते दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज