मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील पडलेल्या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांची गोची झाली असून त्यांना दुसऱ्या ठिकाणी उभा रहावे लागणार आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण हे ओबीसी असल्याने दावेदार असणारे दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, माजी सभापती प्रदीप खांडेकर, महावीर ठेंगील, अॅड. सुरैय्या लतीफ तांबोळी, दामाजीनगरचे सरपंच जमीर शेख, माजी सभापती रमेश भांजे हे इच्छुक आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांचे आरक्षण काल सोलापूर येथे जाहीर झाले असून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. येथील दामाजीनगर गट ओबीसीसाठी, हुलजंती गट सर्वसाधारण महिला, लक्ष्मी दहिवडी गट अनुसूचित जाती महिला तर भोसे गट सर्वसाधारण म्हणून आरक्षित झाले आहेत.
भोसे गट मागील वेळी देखील खुला होता. त्यावेळी दिलीप चव्हाण हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. सध्या पडलेल्या आरक्षणामुळे पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे.
भोसे गटात भैरवनाथचे चेअरमन अनिल सावंत, नागरिकांच्या जास्त संपर्कात असलेले ‘दामाजी’चे संचालक तानाजी काकडे, बसवराज पाटील, माजी सदस्य नितीन पाटील, संग्रामसिंह माने, रामचंद्र जाधव यांची नावे आघाडीवर आहेत.
दामाजी नगर गट यापूर्वी खुला होता, त्यावेळी नितीन नकाते यांनी सदस्य म्हणून काम केले होते. यावेळी ओबीसी आरक्षण पडले असून हुलजंती गटातील अनेक इच्छुक दामाजी नगर गटातून निवडणूक लढवू शकतात.
श्री दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी गेल्या तीन वर्षात कारखाना चांगला चालवल्यामुळे येथील सभासद वर्ग त्यांच्या पाठीशी राहू राहू शकतात.
यापूर्वी त्यांनी जिल्हा आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते परिचारक यांच्याशी एकनिष्ठ असल्यामुळे ते निवडून आल्यानंतर त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष देखील मिळू शकते.
दामाजी नगरचे सरपंच असलेले जमीर शेख यांनी देखील गेल्या तीन वर्षात दामाजी नगर ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामे करून कायापालट केला आहे. त्यांच्या मागे ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे व सिद्धेश्वर आवताडे यांची ताकद आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस लतीफ भाई तांबोळी यांच्या कन्या अॅड. सुरैया तांबोळी ह्या देखील इच्छुक असून त्यांच्या वडिलांनी या भागातील कार्यकर्त्यांशी असणारी जवळीक व या गटातील मुस्लिम लोकसंख्या लक्षात घेता त्यादेखील इच्छुक आहेत.
त्याचबरोबर महावीर ठेंगील, जरांगे यांच्या आंदोलनामुळे ओबीसी दाखला मिळालेले लाडीक डोके, माजी उपसभापती रमेश भांजे, रवींद्र पुजारी हे इच्छुक आहेत.
हुलजंती गट हा यापूर्वी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित होता. आता या गटात सर्वसाधारण महिलेस संधी मिळणार असून येथे अॅड. रोहिणी पवार ह्या माजी सदस्य असून त्या निवडणूक लढवू शकतात त्यांचे वडील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन होते.
तसेच दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील यांच्या सुनबाई, विजय माने यांच्या पत्नी, तसेच माजी सभापती राजाराम जगताप यांच्या घरातील सदस्य उभा राहू शकतात. या गटातून हनुमंत दुधाळ आणि प्रदीप खांडेकर यांनी गेल्या अनेक दिवसापासून मोर्चेबांधणी केली होती.
राष्ट्रवादीकडून लतीफ तांबोळी यांची कन्या अॅड. सुमैय्या तांबोळी यांचीही उमेदवार येऊ शकते. लक्ष्मी दहिवडी गट ओबीसी महिलेसाठी यापूर्वी आरक्षित होता, त्यावेळी मंजुळा कोळेकर या सदस्य म्हणून काम केले आहे. सध्या हा गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.
या गटात पाठखळचे उपसरपंच शशिकांत सावंत यांच्या पत्नी, माजी समाजकल्याण सभापती शीला शिवशरण इच्छुक असून त्यांनी सभापती असताना तालुक्यात कोणताही गट माणसे जोडली होती. त्याच जोरावर ते येथे उभा राहू शकतात.
तसेच अंधलगाव येथील माजी सरपंच बाळासाहेब डांगे यांच्या पत्नी सुवर्णा तसेच माजी उपसरपंच अंकुश डांगे यांच्या पत्नी शीतल डांगे यांची नावे पुढे येत आहेत.
हा गट जनरल पडेल या आशेने या गटातून मारापूरचे सरपंच विनायक यादव व पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी गावकरे हे तयारी करीत होते. मात्र आरक्षण पडल्याने त्यांना पर्याय शोधावा लागला आहे.
या आरक्षणामुळे अनेकांना जिल्हा परिषदेची पंचायत समितीवर मिळवावी लागली असून काहींना रिंगणातूनच बाहेर पडावे लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज