मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
नव्याने निघालेल्या आरक्षणामुळे आपला गट, गण कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. या धास्तीने इच्छुकांची धडधड कमी झाली आहे. आज काढण्यात आलेल्या सोडतीकडे अनेकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील आठ गणात पुढील प्रमाणे आरक्षण निघाले आहे-
मरवडे – सर्वसाधारण ( महिला)
भोसे – सर्वसाधारण
लक्ष्मी दहिवडी – सर्वसाधारण
रड्डे – अनुसूचित जाती
बोराळे – सर्वसाधारण (महिला)
हुलजंती – नामाप्र
संत चोखामेळा नगर – सर्वसाधारण (महिला)
संत दामाजी नगर – नामाप्र ( महिला)
जिल्हा परिषद 4 गटात हे आरक्षण पडले
भोसे – सर्वसाधारण
लक्ष्मी दहिवडी – अनुसूचित जाती (महिला)
हुलजंती : सर्वसाधारण (महिला)
दामाजीनगर ; नामाप्र
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे नेतृत्व तयारी करणारी राजकीय कार्यशाळा म्हणून पाहिले जाते. येथून उदयाला येणाऱ्या नेतृत्वाने जिल्ह्यात नव्हे, तर विधानसभा आणि लोकसभेत उल्लेखनीय काम केल्याचा जिल्ह्याचा इतिहास आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांच्या सभापतींसह जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्ह्याचे धोरण ठरवण्याबरोबर राज्याला दिशादर्शक धोरण निश्चित करण्याची संधी मिळते.
त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचा सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळावी, अशी अनेकांची राजकीय इच्छा असते. यातूनच या निवडणुकीत इच्छुकांची गर्दी नव्हे, तर भाऊगर्दी असते.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात २०१७ ला अखेरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. दरम्यान आठ वर्षांपासून ग्रामपंचायत वगळता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. दरम्यानच्या काळात विधानसभेच्या दोनदा निवडणुका झाल्या.
मंगळवेढा तालुक्यातील भोसे गटांमध्ये सर्वात जास्त दुरुस्त पाहायला मिळणार आहे, तसेच पंचायत समिती भोसे गणामध्ये सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडल्यामुळे दोन्ही निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज