मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
वरळीवरून वांद्रेला जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या ईरटीका कारचे वेगावर नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट समुद्रात कोसळली. त्या क्षणी त्या ठिकाणी सेवेत उपस्थित असलेल्या
महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान सुहास कडसरे यांनी तात्काळ समुद्रात उडी मारत त्या कारचालकाचा जीव वाचवला. त्याच्या या धाडसाचे कौतुक होत असून तो मंगळवेढा तालुक्यातील हिवरगाव येथील राहणारा आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरळीवरून वांद्रेला जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवरून ब्रिजेस बत्तीवाला हा त्याच्या ताब्यातील कार घेऊन भरधाव वेगाने काल रात्री 10.50 मि. जात असताना त्याचे वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट समुद्रात कोसळली.
जीव वाचवण्यासाठी कारमधील चालक काच तोडून बाहेर आला. मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो गयावया करू लागला. त्या क्षणी वरळी पॉईंटवर सुहास दादा कडसरे (रा.हिवरगाव ता.मंगळवेढा), पांडुरंग काळे, रा. कळमन ता. उत्तर सोलापूर हे दोघे जवान त्या ठिकाणी कार्यरत होते.
कडसरे यांनी तात्काळ आपल्या जिवाची पर्वा न करता तात्काळ थेट समुद्रात उडी मारली आणि त्याला वाचवले. त्या क्षणी दुसऱ्या जवानाने आपल्या इतर सहकाऱ्यांना हाक दिल्यानंतर
त्या ठिकाणी पाच जवान आणि त्यांचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन दोरीच्या साह्याने त्याला वर अलगद बाहेर काढले व त्याचा जीव वाचवला. सुहास कडसरे यांनी दाखवलेल्या धाडसा बद्दल मंगळवेढा तालुक्यात कौतुक होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज