मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
नागझरी नदीच्या बंधाऱ्यावरील पाण्यात मुलाला बुडताना पाहून त्याला वाचविण्यासाठी वडिलांनी जिवाची बाजी लावली, पण दुर्दैवाने या घटनेत पित्याला मात्र जलसमाधी मिळाली. ही हृदयदावक घटना बार्शी तालुक्यातील वैराग धामणगाव रोडवरील नागझरी नदीच्या बंधाऱ्यावर रविवारी दुपारी घडली.
अरुण ऊर्फ डेविड बनसोडे (वय ४०,मूळ रा. आसरा, होटगी रोड, सोलापूर) असे मृत्यू पावलेल्या पित्याचे नाव असून, मुलगा अनुग्रह बनसोडे (वय ११) याच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी की, सध्या धामणगाव येथे राहणारे अरुण बनसोडे हे पत्नी, मुलासह वैरागवरून धामणगावकडे जात होते.
दरम्यान, ते नागझरी नदीच्या बंधाऱ्यावर थांबले. त्यांचा मुलगा अनुग्रह बनसोडे याचा अचानक पाय घसरला आणि तो नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात पडला.
मुलाला बुडताना पाहून क्षणाचाही विलंब न लावता डेविड बनसोडे यांनी तत्काळ पाण्यात उडी घेतली. त्याने धाडसाने अनुग्रह याला पाण्याबाहेर काढले, मात्र स्वतः पाण्याच्या भोवऱ्यात अडकले. त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते पाण्यात बुडू लागले.
हा थरार पाहून धामणगाव येथील प्रथमेश देशमुख, विठ्ठल खडके, संपत आलाट, नागेश जाधव यांनी, तसेच बंधाऱ्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना वाचण्यासाठी तत्काळ पाण्यात उतरले.
त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले आणि संजय गाडे यांच्या रिक्षांमधून उपचारासाठी घेऊन जात असताना पोलीस पाटील गणेश मसाळ तातडीने अॅम्बुलन्सला संपर्क केला. रस्त्यातच अॅम्बुलन्स आल्यावर त्यांना तातडीने बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली असता अरुण ऊर्फ डेविड बनसोडे यांचा उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अनुग्रहची प्रकृती चिंताजनक..
अनुग्रह बनसोडे याला पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेची माहिती पोलिस पाटील गणेश मासाळ यांनी तत्काळ वैराग पोलिस ठाणे आणि महसूल विभागाला दिली आहे. लेकराला वाचविण्यासाठी स्वतःचा जीव गमाविलेल्या या पित्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज