मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
दिवाळी झाल्यानंतर दोन दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची आचारसंहिता राज्यात लागू होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस जिल्हा परिषद आणि डिसेंबर महिन्याच्या अखेरीस महानगरपालिका निवडणुका लागणार आहेत.
त्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना कुर (ता. भुदरगड) इथे आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे.
आता कुणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटते. मी ४० वर्षे यामध्ये घालवली त्यामुळे मी अंदाज मांडला आहे.
दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असा कानमंत्र त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्याक्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असे लढणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज