टीम मंगळवेढा टाइम्स न्युज ।
सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांचा मंगळवेढा शहरातील दामाजी चौकात निषेध नोंदवला असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
एन.डी.टी.व्ही मराठी वाहिनीवरील चर्चेदरम्यान आरक्षणासंदर्भात प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी बहुजन समाजाचा अपमान करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ
आज मंगळवेढ्यात सर्व आंबेडकरवादी पक्ष व संघटनांच्या वतीने जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला.
सकाळी संत दामाजी चौकातून निघालेला हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने चालत तहसील कार्यालयासमोर पोहोचला.
यावेळी सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत ढोबळे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आणि सरकारने त्यांच्या विरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.
सिद्धार्थ रावसाहेब लोकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरवादी कार्यकर्ते, महिला आणि युवक सहभागी झाले होते. “बहुजनांचा अपमान सहन केला जाणार नाही”, “आरक्षण आमचा अधिकार आहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
शासनाने प्रा ढोबळे यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आयोजकांनी दिला. मोर्चा शांततेत पार पडला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
याप्रसंगी माजी नगरसेवक प्रविण खवतोडे, वंचित जिल्हाउपाध्यक्ष धनाजी सरवदे, आरपीआय आठवले गट माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव, ऑल इंडिया पँथरसेना तालुकाध्यक्ष सिद्धार्थ लोकरे, खोमनाळ ग्रामपंचायत सदस्य निखिल सरवदे,ऍड.रोहीत एकमल्ले,
वंचित तालुकाध्यक्ष अशोक माने, वंचित युवा जिल्हाध्यक्ष पंकज पाराध्ये, शहराध्यक्ष अजय गाडे, सचिव सोमनाथ ढावरे, रिब्लिकन सेनेचे दऱ्यापा कांबळे, बांधकाम कामगार संघटना जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाले,
वैभव भंडारे, लखन कांबळे, सागर खरबडे, लखन शिकतोडे, बाळासाहेब साखरे, मेजर गणेश शिकतोडे, किशोर कसबे, सुभाष भंडारे, निशार शेख, प्रमोद सावंत, आबा गायकवाड, येताळा खरबडे, बंटी भंडारे, दत्ता लांडगे, समाधान आठवले, विनोद लोकरे, दिनकर गोवे आदीजन, मेघराज लोकरे, हर्षद खवतोडे उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज