टीम मंगळवेढा टाईम्स।
उजनी धरणातून एक लाख क्यूसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आल्याने रहाटेवाडी-तामदर्डी जुन्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
अशा गंभीर परिस्थितीत सोमवारी सायंकाळी ६ वाजता एका शिक्षकाचा जीव पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या क्षणी राहिला असता, रहाटेवाडीतील तरुणांच्या शौर्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सोलापूर शिक्षण विभागातील विशेष तज्ञ शिक्षक शिक्षण परिषदेसाठी बोराळे येथे गेले होते. परत येताना ओढ्यात पाणी असल्यामुळे काही नागरिकांच्या सल्ल्याने ते तामदर्डी–रहाटेवाडी मार्गे जात होते. मात्र तेथील वाढत्या पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह ते पुराच्या प्रवाहात वाहून जाऊ लागले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या रहाटेवाडीचे सरपंच लक्ष्मण धसाडे, उपसरपंच प्रदीप पवार, तसेच अनिल पवार, जतीन सोनवले, महावीर सोनवले, धोंडीराम पवार, किशोर पाटील, सुशांत पवार,
निलेश सोनवले आणि शंकर जाधव या तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता पुराच्या पाण्यात जाऊन हातात हात घेऊन साखळी तयार करत त्यांनी मोठ्या कौशल्याने शिक्षकाला ओढून सुरक्षित बाहेर आणले.
या धाडसी प्रयत्नामुळे शिक्षकाचा जीव वाचला, मात्र त्यांची दुचाकी प्रवाहात वाहून गेली. ग्रामस्थांनी या तरुणांच्या शौर्याचे आणि तत्परतेचे कौतुक करत “त्यांच्या वेळेवर दाखवलेल्या धाडसामुळे आज एक अनर्थ टळला” अशी भावना व्यक्त केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज