मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कर्नाटककडे एक पिकअप वाहन जात असताना बालाजीनगर येथे रात्री १.३० वाजता अडवून टॉमीच्या सहाय्याने दोघांना मारहाण करुन खिशातील जबरदस्तीने १० हजार ४०० रुपये व फोन पे व्दारे ५ हजार रुपये काढून घेतल्याप्रकरणी
विठ्ठल रेवाप्पा केंगार, नवनाथ भिमराव भंडगे, विशाल राजू केंगार (रा.साठेनगर मरवडे), दिगंबर उर्फ केंदया पाटील (रा.वडरगल्ली मंगळवेढा) या चौघा विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान मध्यरात्री मंगळवेढा पोलीस गस्त घालीत असताना ही वाटमारी उघड झाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी यास्मिन शेख (वय २६ रा. सरडे ता. फलटण) याची महिंद्रा कंपनीचे पिकअप क्रमांक एम.एच.१० सी.आर.००१९ या मधून फिर्यादी व त्याचा मित्र संदिप चव्हाण हे कर्नाटक राज्यातील चडचण येथे जात असताना
दि.२८ रोजी १.३० वाजता बालाजीनगर (ता. मंगळवेढा) या ठिकाणी कारखान्याजवळ आल्यावर गतीरोधक असल्याने फिर्यादीने गाडी सावकाश घेतली असता गाडीच्या पाठीमागून मोटर सायकलवर चौघेजण वरील आरोपी आले व गाडीच्या पुढे येवून दुचाकी वाहनाला आडव्या लावल्या.
चौघा आरोपींनी दोघांना खाली उतरून टॉमीने मारहाण करीत पैशाची मागणी केली. त्यावेळी फिर्यादीने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितले असता पुन्हा जोराने मारहाण करण्यास सुरुवात केली.
वरील आरोपींनी फिर्यादीच्या पँटच्या खिशातील १० हजार ४०० रुपये काढून घेतले व आणखीन पैशाची मागणी केली. तद्नंतर मोबाईल हिसकावून घेवून शिवीगाळी करीत फोन पे व्दारे पैसे पाठविण्याची धमकी दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर वरील दोघा आरोपींनी पल्सर मोटर सायकलवर बसवून माळरानावर नेवून सगळे पैसे दे अन्यथा तुझी गाडी व तुम्हाला सोडणार नाही अशी दमदाटी केली.
या दरम्यान मंगळवेढा पोलीसांची गस्त घालणारी पोलीस व्हॅन आल्याने पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी फिर्यादी व त्याचा मित्र यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर या घटनेचे बिंग बाहेर पडले. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज