मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती उद्भवली आहे. पूर परिस्थिती संदर्भात उपाययोजना करून बाधित नागरिकांना मदत करणे सोपे जावे,
त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या कारणामुळे साप्ताहिक कार्यालयीन सुट्टी असली तरी रविवारी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
रविवार हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. सीना नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. भीमा नदीत उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे.
त्याबरोबरच जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. या कारणाने नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. या कारणामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज रविवार, दि.२८ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज