टीम मंगळवेढा टाईम्स ।
अखिल भारतीय महासंघ, मराठा मंगळवेढाच्यावतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मराठा आरक्षणाचे जनक व थोर मराठा आमदार कै. आण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त
आज गुरुवार दि.२५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.०० वा. ढगे डिजीटल समोर जवाहरलाल हायस्कूल प्रशालेजवळ मंगळवेढा येथे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सचिन डोरले यांनी दिली आहे.
सदरचा कार्यक्रम तालिका सभापती आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते, सिंहगर्जना ग्रुप पंढरपूरचे संस्थापक,
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
यावेळी मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र वाकडे, धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समाजभूषण पुरस्कार मानकरी
यावेळी न.पा.शिक्षण मंडळाचे माजी लेखापाल म. महामुद दरवाजकर यांना मरणोत्तर समाजभूषण तसेच माजी नगरसेवक ह.भ.प. जोतीराम गोवे महाराज, माजी उपनगराध्यक्ष मच्छिंद्र कोंडुभैरी, माजी नगरसेवक नानासाहेब उन्हाळे,
माजी नगरसेविका रतन नागणे, न.पा. शिक्षण मंडळाचे सेवानिवृत्त लेखापाल दऱ्याप्पा दत्तू, माजी नगरसेवक लक्ष्मण शिंदे आदींना समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अ.भा. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सचिन डोरले, प्रा. शिवाजी नागणे, अमोल सातपुते, महेश डोरले, तानाजी दिवसे, आनंद इंगळे आदिंनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज