मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
काँग्रेसच्या वतीने मंगळवेढा नगरपालिकेच्या समोरच प्रशासनाचे पिंडदान करत बोंब मारो आंदोलन करण्यात आले.
मंगळवेढा शहरांमध्ये ठीक ठिकाणी गटारीचे पाणी साठून तळ्याचे स्वरूप आले आहे. अनेकांच्या घरांमध्ये किचन पर्यंत गटारीचे पाणी गेले आहे.
आपत्कालीन परिस्थिती असताना नगरपालिका प्रशासन कोणतीही दखल घेताना दिसत नसल्यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या समोरच नगरपालिका प्रशासनाचे पिंडदान करून प्रशासनाचा व प्रशासनाच्या जीवावर गेली चार वर्षे नगरपालिकेचा कारभार सोपवणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवत
मंगळवेढा काँग्रेस कमिटीच्या वतीने बोंबाबोंब करत अधिकाऱ्यांना जणाची नाही तर मनाची लाज वाटावी म्हणून मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीला, प्रशासकीय अधिकारी तसेच बांधकाम अभियंता यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालण्यात आले.
यावेळी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष ॲड.राहुल घुले म्हणाले की, लवकरात लवकर शहरातील गटरीच्या पाण्याचे नियोजन करा लोकांच्या घरात गटरीचे पाणी शिरल्यास नगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना गटरीच्या पाण्यात बुडवले जाईल असा इशारा दिला.
यावेळी गणेश धोत्रे, मुजम्मील काझी, माऊली कोंडुभैरी, संदीप फडतरे, अजय गाडे, विजय हजारे, मनोज माळी, अर्जुन देवकर, प्रदीप घुले, फारूक मुजावर, किरण घोडके, अमोल घुले, अरबाज तांबोळी, सचिन साळुंखे उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज