मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
आरटीओ ई-चालान’वर क्लिक करताच बँक खात्यातून तब्बल 5 लाख रुपये उडाल्याचे घटना भंडारा शहरात घडली आहे. आरटीओच्या नावाने बनावट ई-चालान पाठवून नागरिकांना लुटण्याचा सायबर लुटारूं नी नवा फंडा अवलंबला असल्याचे यातून समोर आलं आहे.
परिणामी, पैशाचे व्यवहार करताना सुरक्षित वेबसाईटवरूनच करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यां नी नागरिकांना केलं आहे.
लिंक उघडताच मोबाइल हॅक; काही क्षणातच 5 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर
गोंदिया शहरातील सराफा लाइन, दुर्गा चौक येथे राहणारे विवेक अग्रवाल (वय 49) या सराफा व्यापाऱ्याच्या खात्यातून तब्बल 5 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.
अग्रवाल यांच्या मोबाइलवर ‘आरटीओ ई-चालान एपीके’ या नावाची लिंक आली. त्यांनी ती लिंक उघडताच मोबाइल हॅक झाला.
काही क्षणातच त्यांना एचडीएफसी बँकगोंदिया शाखेतील त्यांच्या चालू खात्यातून 5 लाख रुपये आयएमपीएसद्वारे काढण्यात आल्याचा मेसेज आला.
बँकेत चौकशी केली असता, संबंधित रक्कम ओडिशा राज्यातील पुरी शहरातील एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून ट्रान्सफर झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अशुतोष नायक नावाच्या व्यक्तीने दुपारी 3.37 वाजता चेकद्वारे संपूर्ण रक्कम विड्रॉल केली असल्याचे नोंदीत दिसून आले.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
या घटनेनंतर अग्रवाल यांनी त्वरित बँकेला माहिती दिली व पोलिसांत तक्रार नोंदवली. सायबर फसवणुकीच्या या गंभीर प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. या फसवणुकीबाबत अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318 (4) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (डी) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तर नागरिकांनी पैशाची व्यवहार करत असताना सुरक्षित ॲप किंवा वेबसाईटवरून व्यवहार करावे, असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज