मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अखेर सोलापूरहून मुंबई आणि बंगळुरूला जाण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे. १५ ऑक्टोबरपासून सोलापूरहून मुंबई आणि बंगळुरूला विमान झेपवणार आहे. याबाबतचे अधिकृत वेळापत्रक समोर आले आहे.
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी याबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबईहून सोलापूर प्रवास कऱणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
तुळजापूर, पंढरपूर अन् अक्कलकोट यासारख्या देवस्थानाला जाणाऱ्यांची संख्या पाहून केंद्र सरकारने मुंबई-सोलापूर अशी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर विमानतळाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर Fly91 द्वारे सोलापूर-गोवा या मार्गावर विमानसेवा सुरू कऱण्यात आली होती.
आता सोलापूरहून मुंबई आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. १५ ऑक्टोबरपासून सोलापूरहून मुंबई आणि बंगळुरूला विमान उड्डाण घेणार आहे. सोलापूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण असेल.
सोलापूरच्या विकासात महत्त्वाचा टप्पा
मुरलीधर मोहोळ, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्रीमुंबई आणि बंगळुरूला सुरू होणाऱ्या विमानसेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहेच. त्याशिवाय परिसरातील गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना मिळेल. सोलापूरसारख्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई आणि बेंगळुरूशी जोडणे ही काळाची गरज होती. सोलापूरच्या विकासात ही सेवा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
आजपासून बूकिंगला सुरूवात
राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूरहून दोन नव्या मार्गावर विमानसेवा सुरू कऱण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. ते म्हणाले की, सोलापूर विमानतळावरून उड्डाणे सुरू करण्याची मागणी होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डाणे सुरू करण्यासाठी व्यवहार्यता अंतर निधी मंजूर केला आहे आणि स्टार एअर ही सेवा सुरू होईल. १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई-सोलापूर विमानसेवेचे उद्घाटन करणार आहेत. या मार्गावरील विमानसेवेसाठी २० सप्टेंबरपासून बुकिंगला सुरूवात होणार आहे.
वेळापत्रक काय असेल? वाचा सविस्तर
सोलापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी विमानसेवा सुरू राहणार आहे. सोलापूरहून मुंबईला जाणारे विमान दुपारी १२.५५ वाजता उड्डाण घेईल. तर मुंबईहून सोलापूरला जाणारे विमान दुपारी २.४५ वाजता निघेल. सोलापूरहून बेंगळुरूला जाणारे विमान दुपारी ४.१५ वाजता उड्डाण घेईल. तर बेंगळुरूहून सोलापूरला येणारे विमान सकाळी ११.१० वाजता निघेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज