टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविला जात असून यातीलच एक उपक्रम म्हणून तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या वतीने आज शुक्रवार दि.19 रोजी ‘रस्ता अदालत’ आयोजित करण्यात आली आहे.
सेवा पंधरवडा अंतर्गत मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत एकूण 583 रस्त्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून त्याचे सीमांकन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याचबरोबर तहसील कार्यालयात ज्यांचे मामलतदार कोर्ट ऍक्ट कलम 5 अंतर्गत रस्ता अडविल्याची प्रकरणे व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम मधील कलम 143 अंतर्गत नवीन रस्ता मागणी संदर्भात जी प्रकरणे सुनावणीवर आहेत.
या प्रकरणात सुद्धा अर्जदार, गैरअर्जदार तसेच दोन्ही पक्षाचे विधिज्ञ यांच्या माध्यमातून प्रकरणात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आज दुपारी 2 वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात
सदरची रस्ता अदालत आज शुक्रवार दि.19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
वाद आपसी सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न
या रस्ता अदालत मध्ये शेत रस्ता, शिव रस्ता, पाणंद रस्ता बाबतचे वाद आपसी सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तरी ज्यांचा रस्त्याविषयी वाद असेल त्यांनी रस्ता अदालत मध्ये सहभाग घेऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज