मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावांतील ५८३ पाणंद रस्त्यांना सांकेतिक क्रमांक मिळणार आहेत, याबाबत बुधवारी तालुक्यातील ८१ गावांमध्ये झालेल्या ग्रामसभेत रस्त्यांची यादी वाचण्यात आली.
तसेच ग्रामसभेची मंजुरी घेऊन त्याची पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन प्रशासनाने केल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत व सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील ग्रामसभांमध्ये एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
शासनाच्या आदेशानुसार दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा तीन टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आला असून, यामध्ये पाणंद रस्तेविषयक मोहीम, सर्वासाठी घरे आणि नावीन्यपूर्ण उपक्रम यांचा समावेश आहे.
पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. दि. १० ते १३ सप्टेंबरदरम्यान तालुक्यातील ८१ गावांमध्ये शिवार फेरी कार्यक्रम राबवून मंडळाधिकारी, ग्रामसेवक, महसूल सेवक व पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत नकाशावरील रस्ते व नकाशावर नोंद नसलेले रस्ते नोंदविण्यात आले.
या सर्वेक्षणात एकूण ५८३ रस्ते नोंदविण्यात आले असून, त्यामध्ये ४२४ रस्ते नकाशावर नोंद असलेले व १५९ रस्ते नकाशावर नोंद नसलेले असल्याचे स्पष्ट झाले. याच बैठकीत ७/१२चा चावडीवाचन उपक्रम देखील पार पडला. यात मयत खातेदारांची माहिती संकलित करण्यात आली.
शेतकऱ्यांना १२ फूट रस्ता देणारे पहिले राज्य
शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे,
शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. सीमांकनासाठी रस्त्यांच्या किनारी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज