मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
अधिकाधिक मुलांनी सरकारी शाळेत शालेय शिक्षण घ्यावे, याकरिता प्रोत्साहन म्हणून सोलापूर जिल्ह्यातील गोगाव ग्रामपंचायतीने एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.
गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायत करात ५०% सूट मिळणार आहे.
गोगांव जिल्हा परिषदेच्या शाळेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि गावातील शिक्षणाचा स्तर उंचावावा, हा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे.
गोगावमधील या शाळेत सध्या ६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आणि गावात सुमारे ५०० कुटुंबे राहतात. या कुटुंबांना वार्षिक ३००० रुपयांचा वार्षिक कर भरावा लागतो.
सरपंच वनिता सुरवसे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीकडून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांही दंड आकारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
याचबरोबर एप्रिलमध्ये म्हणजेच जे लोक लवकर कर भरतील, त्यांनाही अतिरिक्त १०% सूट मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
करातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या ५% रक्कम दिव्यांगांना आर्थिक साहाय्य आणि त्यांच्या सामाजिक विकासावर खर्च करण्याचा निर्णय गोगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज