टीम मंगळवेढा टाईम्स।
पाणी पिण्याचा बहाणा करुन रात्री घरासमोर झोपलेल्या एका ७२ वर्षीय वृध्द महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किंमतीचे दागिने जबरदस्तीने चोरट्याने काढून नेण्याचा प्रकार निंबोणी येथे घडला असून अज्ञात चोरट्याविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी, यातील फिर्यादी गिरजाबाई पांडुरंग खांडेकर वय ७२ वर्षे (रा.निंबोणी) या दि.५ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजता फिर्यादी ही त्यांच्या राहते घरासमोरील अंगणात फिर्यादी व फिर्यादीचे पती झोपले असताना दोन अनोळखी चोरटे फिर्यादीच्या जवळ आले व पाणी दया म्हणाले.
फिर्यादी ह्या माणूसकीच्या दृष्टीने त्यांना पाणी देण्याकरिता उठल्या दोघा चोरट्यापैकी एकाने फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळा सोन्याचे गंठण व एक तोळ्याची बोरमाळ असा एकूण ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून घेवून गेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात सातत्याने चोऱ्या होत असून पोलीसांचा वचक कमी झाल्यामुळे चोरटे शिरजोर होत आहेत. गेल्या वर्षभरात पोलीसांना एकही चोरटा पकडण्यात यश आले नसल्यामुळे सुज्ञ नागरिकामधून संतापजनक प्रतिक्रीया उमटत आहेत.
मागील दोन आठवड्यापुर्वी मंगळवेढा शहरातील बायपासजवळ पोलीस असल्याची बतावणी करुन पाच लाखाच्या वृध्देच्या बांगड्या लुटल्या. दि.२६ ऑगस्ट रोजी डोणज येथे चोरट्याने चक्क मंदिरातील गल्ला पळविला. एकाच रात्री तीन चोऱ्या करण्याचा प्रयत्न झाला.
तळसंगी येथे दि.५ ऑगस्ट रोजी एका वस्तीवर मोटर सायकलवर आलेल्या भिक्षेकरूंनी भिक्षा मागण्याचा बहाणा करुन वृध्द महिलेचे १ लाख ४० हजाराचे दागिने पळविले. दि.५ ऑगस्ट रोजी मंगळवेढा बसस्थानकावरील मंद्रुप येथील गंगाबाई धुळखेडे व अन्य एका महिला प्रवाशाचे बस मध्ये चढत असताना ३ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले.
कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नंदूरच्या एका व्यक्तीने १० लाखाची बॅग गाडीत ठेवली होती ही बॅग चोरट्याने पळविली. मंगळवेढा शहरातील धर्मगाव रोडवरील तिघांचे बंगले फोडून दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. मरवडे येथे मुंबईहून आलेल्या एका महिलेचे पाच लाखाचे दागिने पळविले होते.
या व अन्य चोऱ्यांचा अदयापही तपास लागला नसल्यामुळे येथील पोलीस विभाग निष्क्रीय बनत चालल्याच्या भावना सुज्ञ नागरिकामध्ये होत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज