मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा कुणबी मराठाचे दाखले देण्याचा आदेश निघाला असून, तोच न्याय तेव्हा रजाकाराच्या राजवटीखाली असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांनाही मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यासाठी या ५८ गावातील पूर्वजांच्या तुळजापूर तालुक्यातील नोंदीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे वृत्त आज लोकमतने प्रसिध्द केले आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंव्हा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढला आहे.

हैदराबाद संस्थानमध्ये असल्याचे १९०९ जनगणनेत नोंद आहे व १९५० निजाम करारानुसार सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावे हैदराबाद संस्थांनमधून बाहेर पडली.

या हैदराबाद गॅझेटिअर व सध्या सोलापूर जिल्ह्यात समावेश असलेल्या ५८ गावांतील मराठा समाजालाही कुणबी मराठा दाखले मिळणार आहेत. त्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ अगोदर संबंधित स्थानिक रहिवास पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

या गावांचा समावेश
उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी, कौठाळी, साखरेवाडी, कळमण, पडसाळी, वांगी, इंचगाव, रानमसले, बीबीदारफळ, नान्नज, शिवणी, मोहितेवाडी, गरलाचीवाडी, बार्शी तालुक्यातील शेळगाव आर, केवड, मानेगाव, चव्हाणवाडी, हटकरवाडी, कापसेवाडी, धानोरे, बुद्रुकवाडी, पाचफुलेवाडी, खैराव, रिधोरे, उपळाई, सुलतानपूर, मोहोळ तालुक्यातील आष्टी, पोफळी, विरवडे बु., चिखली, यल्लमवाडी, पवारवाडी, बोफले, एकुरके, मनगोळी, भैरववाडी, वाळूज, देगांव, घोरपडी, डिकसळ, खुनेश्वर, भोयरे, प्रसले चौधरी आदी गावे

सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावे हैदराबाद संस्थांनमध्ये असल्याचे गॅझेटमध्ये म्हटले
१९०९ च्या जनगणनेत सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावे हैदराबाद संस्थांनमध्ये असल्याचे गॅझेटमध्ये म्हटले आहे. निजाम करारानुसार १९५० मध्ये ही ५८ गावे हैदराबाद गॅझेटमधून बाहेर पडल्याची नोंद आहे.
तसे पुरावे आम्ही न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीकडे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांच्या माध्यमातून अजितदादांनी सादर केले होते.
हैदराबाद गॅझेटिअर आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांच्या मराठा कुटुंबांना १३ ऑक्टोबर १९६७ अगोदरचा मराठवाड्यातील विशेषतः तुळजापूर तालुक्यातील पुरावा द्यावा लागणार आहे.- पंडित ढवण
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












