मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उसळलेल्या आंदोलनाने उग्र वळण घेतले असताना मंगळवेढा तालुक्यातील अनेक मराठा पुढारी मात्र आंदोलनापासून कोसो दूर राहिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
समाजासाठी लढा देण्याऐवजी हे पुढारी सत्ताधाऱ्यांच्या जवळीक साधून स्वतःच्या खुर्च्या व स्वार्थ जपण्यात अधिक रस दाखवत आहेत. एकीकडे आंदोलनात जीव धोक्यात घालून मराठा समाजातील तरुण रस्त्यावर लढत आहेत,
तर दुसरीकडे तालुक्यातील भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत वगळता अन्य तथाकथित नेतेमंडळी समाजात एक चेहरा दाखवतात आणि सत्तेच्या गल्लीत दुसरा.
या दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून लोकांमध्ये या पुढाऱ्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भैरवनाथ शुगर व अनिल सावंत यांनी मुंबईकडे जाणाऱ्या प्रत्येकाला नाष्टा, पाणी बाॅटल बाॅक्स, टोपी, गमजे आदी साहित्य गाडीसोबत दिले आहे.
समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस भूमिका घेणे, आंदोलनाला नैतिक व प्रत्यक्ष साथ देणे ही अपेक्षा असताना अनेक नेते फक्त आश्वासनांवर थांबले आहेत.
काहींनी तर उघडपणे आंदोलनास पाठिंबा देण्याचे टाळले असून, “स्वार्थासाठी समाजाला विसरणारे हे पुढारी आता उघडे पडले आहेत” अशा तीव्र प्रतिक्रिया जनतेकडून उमटत आहेत.
दरम्यान, आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यावर तालुक्यातील नेतृत्वाचा अभाव जाणवत असून, “मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यात पाठीशी उभे न राहणाऱ्या पुढाऱ्यांना आता जनता माफ करणार नाही” असा सूर समाजातून उमटू लागला आहे.
गावागावांत चर्चा रंगली असून, “समाजाशी विश्वासघात करणाऱ्यांना आता राजकारणातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे” असे मत नागरिक मांडत आहेत.
खऱ्या अर्थाने समाजाशी प्रामाणिक राहून, आंदोलकांसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणारे नवे नेतृत्व समाज शोधत आहे. आता खुर्चीच्या मोहात अडकलेल्या पुढाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धार मराठा समाजाने घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
ऐतिहासिक आंदोलनात सर्व मराठा समाजबांधवांनी एकजुटीने सहभागी व्हा..!
मराठा समाजाच्या हक्कासाठी, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या हक्कासाठी आरक्षण लढ्याचा महत्वाचा टप्पा सुरू आहे, मुंबई येथे होणाऱ्या ऐतिहासिक आंदोलनात सर्व मराठा समाजबांधवांनी एकजुटीने सहभागी व्हावे असे आवाहन अनिल सावंत यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज