मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
“सेवा, सुरक्षा अन् कर्तव्याशी एकसंघ” हे ब्रीद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या कल्याणासाठी झटणारी संघटना म्हणून काम करत असलेल्या
मराठी पत्रकार संघाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी साप्ताहिक रणयुग टाइम्सचे संपादक प्रमोद बिनवडे तर शहराध्यक्षपदी साप्ताहिक मंगळवेढा दिशाचे संपादक महादेव धोत्रे यांची निवड करण्यात आली.
सोलापूर येथील सुंदर मल्टिपर्पज हाॅल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बिनवडे व धोत्रे यांना मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
हि निवड एका वर्षासाठी करण्यात आली असून यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष किरण जोशी म्हणाले की,
संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कल्याणकारी योजना आणि सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी ही मराठी पत्रकार संघटना प्रामुख्याने काम करत असून
राज्यातील पत्रकारांची सेवा व सुरक्षा यांच्याशी कायम बांधील राहिलेली ही संघटना असून येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वतीने सर्व स्तरातील पत्रकारांसाठी विविध उपक्रम व योजना राबवून पत्रकारांच्या कल्याणासाठी शासनाच्या वतीने आपण प्रयत्न करणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले.
यावेळी दैनिक पुण्यनगरीचे व्यवस्थापकीय संपादक व्यंकटेश पटवारी,प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे, खजिनदार विवेक इनामदार,पंढरपूर तालुकाध्यक्ष मिलिंद यादव, सांगोला तालुकाध्यक्ष किशोर म्हमाणे, मोहोळ तालुकाध्यक्ष किशोर मारकड,बालाजी शेळके,
पंढरपूर शहराध्यक्ष दिनेश खंडेलवाल,पंढरपूर शहर शहराध्यक्ष विनोद पोतदार, दैनिक पुण्यनगरीचे कृष्णकांत चव्हाण, एनडी टीव्हीचे सौरभ वाघमारे, सदस्य संकेत किल्लेदार यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज